Taloja : तळोजात 410 कोटी रुपयांचा अमली पदार्थ नष्ट, मुंबई सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई
Mumbai Customs Action : या वर्षात मुंबई सीमाशुल् विभागाने जवळपास 1515 कोटी रुपयांचे एकूण 244 किलो अमली पदार्थ नष्ट केले आहेत.
Mumbai Customs Action : मुंबई सीमाशुल्क विभागाच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 13 डिसेंबर रोजी तळोजा येथे हेरॉईन, कोकेन, गांजा, चरस यासारखे अमली आणि मनावर परिणाम करणारे नशा आणणारे 54.850 किलो पदार्थ (NDPS), नष्ट केले. अंमली पदार्थ नष्ट करण्याची मोहीम, मुंबई सीमाशुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या मुंबई सीमाशुल्क क्षेत्र -I, सीबीआयसीच्या उच्चस्तरीय अमली पदार्थ विरोधी समितीसमोर (High-Level Drug Destruction Committee) राबवण्यात आली.
महाराष्ट्रात नवी मुंबईतील तळोजा येथील घातक कचरा प्रक्रिया साठवण आणि विल्हेवाट सुविधा (CHWTSDF), एमडब्ल्यूएमएल येथे हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अवैध बाजारपेठेतील किंमत सुमारे 410 कोटी रुपये आहे.
या वर्षभरात अंमली पदार्थ नष्ट करण्याची ही तिसरी वेळ आहे. पहिल्यांदा अंदाजे 240 कोटी रुपये किंमतीचे 61.585 किलो आणि नंतर अवैध बाजारात 865 कोटी रुपये किंमतेचे 128.47 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. अशा प्रकारे, या वर्षात 1515 कोटी रुपये किमतीचे एकूण 244.905 किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (SIIB) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) यासारख्या विविध संस्थांनी हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई सीमाशुल्क विभाग क्षेत्र -I आपल्या नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी जीवन देण्यासाठी एनडीपीएस पदार्थांच्या अवैध तस्करीविरूद्ध कठोर कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
रायगड पोलिसांची मोठी कारवाई, 106 कोटींचे अमली पदार्थ जप्त
रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई केली आहे. खोपोलीतील एमडी ड्रग्ज (Drugs) बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत पर्दाफाश केला. खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडीया पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी या नावाचा बोर्ड लावून हा ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. यामध्ये 106 कोटी 50 लाखांचं एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलंय. त्याचप्रमाणे या प्रकरणात फरार तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली हा एमडी ड्रग्जचा कारखाना चालवला जात होता. तसेच यावेळी पोलिसांनी 65 लाखांच्या यंत्रसामुग्रीसह जवळपास 107 कोटींचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती देण्यात आलीये. या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यत एकच खबळब उड्यालाचं पाहायला मिळालं.
ही बातमी वाचा: