एक्स्प्लोर

तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळणार; राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती 

Talathi Recruitment : 3110 तलाठी पदांची भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सु​रु होणार असल्याची माहती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिलीय. 

मुंबई : राज्यातील तलाठी (Talathi ) भरती आणि मंडळ अधिकारी (board officer) पदोन्नती प्रक्रियेला गती मिळणार आहे. 3110 तलाठी पदांसाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सु​रु होणार असल्याची माहती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिलीय. 

गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब होत आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळेच तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी अशी एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिलीय. 
 
गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठ्यांसोबत कोणत्या ना कोणत्या कामामुळे संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठ्यांच्या संपर्कात राहावे लागते. त्याळे तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. 3 हजार 110 तलाठी  आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय 7 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आल्याची माहिती विखे-पाटील यांनी दिलीय.   
 
पुणे महसूली विभागाअंतर्गत एकूण 602 तलाठी साझे आणि 100 महसूली मंडळे आहेत. अमरावती महसूली विभागाअंतर्गत एकूण 106 तलाठी साझे आणि 18 महसूली मंडळे आहेत. नागपूर महसूली विभागाअंतर्गत एकूण 478 तलाठी साझे आणि 80 महसूली मंडळे आहेत. औरंगाबाद महसूली विभागाअंतर्गत एकूण 685 तलाठी साझे आणि 114 महसूली मंडळे आहेत. नाशिक महसूली विभागाअंतर्गत एकूण 689 तलाठी साझे आणि 115 महसूली मंडळे आहेत. कोकण महसूली विभागाअंतर्गत एकूण 550 तलाठी साझे आणि 91 महसूली मंडळे आहेत. या सर्व ठिकाणी भरती होणार आहे.

तलाठी पदांची भरती झाली तर राज्यभरातील तलाठ्यांवरील ताण देखील कमी होणार आहे. शिवाय ग्रामीण भागातील लोकांच्या कामाला देखील गती मिळेल असा विश्वास नागरिकांतून व्यक्त होत आहे.  

महत्वाच्या बातम्या

Bullock Cart Race: बैलगाडा शर्यतीवरची सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल राखून  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध

व्हिडीओ

Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण
Dhanashree Kolge vs Tajasvee GHosalkar : TV वरील चेहरा वि.रस्त्यावरील चेहरा, घोसाळकरांविरुद्ध रणशिंग
Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
Embed widget