एक्स्प्लोर

डॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून कठोर कारवाई करा : राहुल शेवाळे

डॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून कठोर कारवाई करा : राहुल शेवाळे

मुंबई : डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना 'देशद्रोही' ठरवून कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबईतील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. मालेगावमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना एमआयएम आमदार मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार शेवाळे यांनी ही मागणी केली आहे.

मालेगावमध्ये डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन करायला हवे. याप्रकरणी संबधित आमदार दोषी असेल तर त्यांच्यावरही कडक कारवाई करायला हवी, असं राहुल शेवाळे म्हणाले.

हल्लेखोरांना देशद्रोही ठरवा अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांबाबत राहुल शेवाळे म्हणाले की, "संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या सावटाखाली असताना, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरवणारे 'देवदूत' आपल्या प्राणांची बाजी लावून या संकटाशी थेट मुकाबला करताहेत. अशा गंभीर परिस्थितीत, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना 'देशद्रोही' ठरवून कठोर शासन करण्याची मी सरकारला विनंती करतो."

मालेगावच्या शासकीय सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह डॉक्टरांना धक्काबुक्कीची घटना बुधवारी (25 मार्च) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. मालेगावमधील महेशनगर भागातील माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला न्यायालयाच्या आदेशाने दाखल करण्यात आले होते. या आरोपीच्या उपचाराचा कालावधी का वाढवण्यात येत आहे, अशी विचारणा करत रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांच्यासह इतर डॉक्टरांना, एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणी आरोपींना अटक करावी या मागणीसाठी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी मागणी करत कामबंद आंदोलन सुरु केलं.

Curfew | बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण

बीडमध्ये पोलिसांना विटांनी मारहाण कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही लोक गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचं तुम्ही बघितले असेल. मात्र, घराच्या बाहेर थांबू नका असे का म्हटले? म्हणून चक्क पोलिसांना मारहाण करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सीरसाळा या गावात ही घटना घडली. कोरोनाचं संकट बाहेर असताना पोलीस रात्रंदिवस मेहनत घेताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच पोलीस नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत आहे. मात्र, आता पोलिसांवरतीच हात उगारले जात असतील तर अशांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.

Malegaon Doctor Beaten | एमआयएम आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरांना धक्काबुक्की Curfew In Maharshtra | बीड | बाहेर थांबण्यास विरोध केल्याने टोळक्याकडून पोलिसांना विटांनी मारहाण

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Embed widget