एक्स्प्लोर

Tadoba Tiger Project | ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला आता ´इको सेन्सेटिव्ह झोन´ची कवच-कुंडले

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या इको सेन्सेटिव्ह झोनमुळे ताडोबा लगत प्रस्तावित असलेल्या बंदर कोळसा खदानीला मोठा धक्का बसला आहे.

चंद्रपूर : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी निश्चित केलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवताल असलेलं 1346 चौरस किलोमीटर क्षेत्र इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून गृहीत धरल्या जाईल. या इको सेन्सेटिव्ह झोनमुळे ताडोबा लगत प्रस्तावित असलेल्या बंदर कोळसा खदानीला मोठा धक्का बसला आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातल्याच नाही तर देशातील सर्वच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा जीव की प्राण आहे. मात्र, हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प गेल्या काही वर्षांत अनेकदा संकटात सापडलाय. याला मुख्य कारण ठरले आहे, ताडोबाच्या आजूबाजूला येणारे उद्योग, कोळसा खाणी आणि पर्यटनाच्या नावावर उभारले जात असलेले हॉटेल आणि रिसॉर्ट्स. कधी कायद्याचा आधार घेऊन तर कधी रस्त्यावर उतरुन मूठभर पर्यावरणवादी कार्यकर्ते ताडोबाच्या मुळावर येणाऱ्या या गोष्टींना विरोध करत राहिलेत. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या याच लढ्याला आता एक महत्वपूर्ण यश आलय.

इको सेन्सेटिव्ह झोन भविष्यात ताडोबासाठी कवच-कुंडले पर्यावरण विरुद्ध विकास हा चंद्रपूर जिल्ह्यात नेहमीच वादाचा मुद्दा राहिलाय. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूला भूगर्भात मोठ्या प्रमाणात कोळसा आहे. या कोळश्यावर अनेकांची नजर आहे. पण या कोळसा खाणी सुरु झाल्या तर वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग नष्ट होणार आहे. त्यामुळे हा इको सेन्सेटिव्ह झोन भविष्यात ताडोबासाठी कवच-कुंडले म्हणून काम करणार आहे.

पर्यटकांसाठी खुशखबर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी खुला

बंदर कोळसा खाण प्रकल्पाला धक्का केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजूर केलेल्या इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये ताडोबा पासून 3 ते 16 किलोमीटरचा भाग समाविष्ट आहे. हे क्षेत्रफळ जवळपास 1346 चौरस किलोमीटर इतकं आहे. ताडोबा लगतचा इतका मोठा भाग इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित झाल्याने प्रदूषणकारी उद्योग आणि कोळसा खाणींचा प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघालाय. सध्या चर्चेत असलेली बंदर कोळसा खाण याच इको सेन्सेटिव्ह झोन मध्ये आहे हे विशेष.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा इको सेन्सेटिव्ह झोन ही गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवाद्यांच्या सुरू असलेल्या एका लढ्याचं यश आहे. ताडोबाला कायद्याचं संरक्षण मिळालं असलं तरी ही कवच-कुंडले कायम अबाधित राहील याकडे सर्वांनाच लक्ष द्यावे लागेल.

Special Report | ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटन सुरू, बफर क्षेत्रातील 13 प्रवेशद्वारातून पर्यटकांना प्रवेश

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget