Pune Crime Swargate depot case: नराधम दत्तात्रय गाडेबाबत धक्कादायक माहिती उघड, अत्याचार प्रकरणात होणार विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती
या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत .

Pune: पुण्यातील स्वारगेट या गजबजलेल्या एसटी डेपोत शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना 25 फेब्रुवारीला घडली .तरुणीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपी दत्ता गाडेला शिरूर तालुक्यातील गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली .दत्ता गाडीला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय .या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेबाबत धक्कादायक खुलासे समोर येत आहेत .दरम्यान स्वारगेट एसटी स्टँड लैंगिक अत्याचार प्रकरणात लवकरच विशेष सरकारी वकील दिला जाणार आहे . (Swargate Sexual Assault)
राज्य सरकार नेमणार विशेष सरकारी वकील
स्वारगेट एसटी स्टँड अत्याचार प्रकरणात लवकरच विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार असून पीडित तरुणीची बाजू मांडण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसात पुढे पोलिसांकडून राज्य सरकारला विशेष वकिलाचे नाव पाठवण्यात येणार आहे .राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती होणार आहे .12 मार्च रोजी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाड्यांची पोलीस कोठडी संपत आहे .दरम्यान येता पंधरा दिवसात या प्रकरणातील आरोपपत्रही दाखल होणार असल्याचं सांगण्यात येतंय.
स्वारगेट अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासे
स्वारगेट अत्याचार प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत .तरुणीला बसमध्ये नेत अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा स्त्रीलंपट,तृतीयपंथीयांशी संबंध ठेवणारा आणि अनेक ठिकाणी एकट्या दिसणाऱ्या महिलांना टार्गेट करायचा अशी माहिती समोर आली आहे .पोलिसांनी आरोपी दत्ता गाडेचा गुन्ह्यांचा रेकॉर्ड तपासला असता त्याचा विरोधात शिरूर व शिक्रापूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन आणि अहिल्यानगर मधील सुपा व कोतवाली पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे .या सहाही गुन्ह्यांमध्ये तक्रारदार महिलाच असल्याची माहिती समोर आली आहे .त्यापैकी एक गुन्हा विनयभंगाचा असून यापूर्वीही महिलांबाबत गुन्हे केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय .
दत्तात्रय गाडे विरोधात दाखल असलेल्या जुन्या सहाही गुन्ह्यांमध्ये तो एकट्या महिलांना पाहून त्यांच्यावर लक्ष्य ठेवून त्यांची लूटमार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. बसची वाट पाहणाऱ्या महिलांना आपल्या चारचाकीत बसवून तो निर्जनस्थळी घेऊन जायचा आणि लुटायचा, अशी बाब त्याच्याबाबत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आली आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

