Swachh Survekshan 2021 : 'सिटिझन फीडबॅक'मध्ये हिंगोली नगरपरिषद देशात प्रथम, कचरा व्यवस्थापनासाठी पश्चिम विभागांमध्ये तिसरा क्रमांक
हिंगोली पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये दमदार स्वरूपाची कामगिरी केली आहे. शहरातील टाकाऊ सर्व कचरा व्यवस्थापनासाठी वेळेवर घंटागाडी त्याचबरोबर सर्व कचर्याचे व्यवस्थित नियोजन सुद्धा केलेले आहे.
हिंगोली : स्वच्छ सर्वेक्षण अभियान सिटिझन फीडबॅक मध्ये हिंगोली पालिका देशांमध्ये प्रथम आली आहे. तर कचरामुक्त शहरामध्ये हिंगोली पालिकेने पश्चिम विभागात तिसरा क्रमांक पटकावला आहे. शनिवारी 20 नोव्हेंबर या दिवशी केंद्राचे प्रधान सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देत हिंगोली पालिकेचा पुरस्कार वितरण करून सत्कार करण्यात आला.
हिंगोली पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये दमदार स्वरूपाची कामगिरी केली आहे. शहरातील टाकाऊ सर्व कचरा व्यवस्थापनासाठी वेळेवर घंटागाडी त्याचबरोबर सर्व कचर्याचे व्यवस्थित नियोजन सुद्धा केलेले आहे. दररोज सकाळी घंटागाडी शहरातील प्रत्येक घराच्या दारावर पोहोचून शहरातील सर्व टाकाऊ कचरा एकत्र करून शहराबाहेर असलेल्या डम्पिंग ग्राउंड मध्ये घेऊन जात असल्याने शहरात कुठेही कचरा असल्याचे दिसून येत नाही.
टाकाऊ कचऱ्यातील ओला कचरा, सुका कचरा जमा करून त्यावर प्रक्रियासुद्धा सुरू केली आहे. यासाठी हिंगोली पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुरवाडे नगराध्यक्ष बाबाराव बांगर व उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक व पालिका कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन शहरातील सर्व कचऱ्याचे सुनियोजित व्यवस्थापन केल्यामुळे हिंगोली पालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सिटिझन फीडबॅक मध्ये भारतात प्रथम आली आहे. लोकसंख्येनुसार 50 हजार ते एक लाख या गटातून हिंगोली पालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान हिंगोली पालिकेला केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2021 च्या निकालांमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी शहरातील सिटीझन फीडबॅक मध्ये पहिला क्रमांक तर कचरा व्यवस्थापनासाठी पश्चिम विभागांमध्ये हिंगोली पालिकेचा तिसरा क्रमांक आला आहे. यासाठी हिंगोली पालिकेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुरवाडे आणि उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांन केंद्रीय नगर विकास प्रधान सचिव शंकर मिश्रा प्रसाद यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
यापूर्वीही हिंगोली पालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग घेत शहर कचरामुक्त करून अनेक पुरस्कार हिंगोली पालिकेच्या नावे घेतली आहेत.
हिंगोली शहरामध्ये सध्या कुठेही कचरा फेकल्याचे निदर्शनास दिसून येत नाही. जागोजागी कचरा कुंड्या त्याचबरोबर सफाई कामगार आणि घंटागाडी यांच्या मदतीने संपूर्ण शहर साफ स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा हिंगोली नगरपरिषदचा संकल्प असतो. याच संकल्पाला शहरातील सर्व पुढारी नगरसेवक त्याचबरोबर सामान्य हिंगोलीकर सुद्धा तेवढाच प्रतिसाद देताना दिसून येत आहे. यामुळेच हिंगोली शहर कचरामुक्त शहर ठेवण्यात पालिका कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना यश आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :