एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्वच्छ भारत मोहिमेत टॉप-20 मध्ये आणण्यासाठी लाच, तिघांना अटक
औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत मोहिमेला औरंगाबादेत भ्रष्टाचाराचा डाग लागला आहे. केंद्र सरकारकडून स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या 3 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.
औरंगाबाद शहराला स्वछता अभियानच्या पहिल्या 20 शहरांमध्ये समाविष्ठ करु, त्यासाठी 5 लाख रुपये द्या, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त प्रकाश बकोरिया यांच्याकडे केली होती.
बकोरिया यांनी यासंदर्भात एसीबीली माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून 1 लाख 70 हजार रुपयांची लाच घेताना या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.
स्वच्छ भारत मोहिमेच्या पाहणीचं काम केंद्र सरकारने एका कंपनीला दिलं आहे. त्या कंपनीशी हे तिन्ही अधिकारी निगडीत आहेत. हे अधिकारी रोज 25 हजाराची दारू पीत असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला लाचखोर अधिकाऱ्यांमुळे गालबोट लागलं आहे.
या अधिकाऱ्यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड, नांदेड, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी तपासणी केली आहे. औरंगाबादनंतर या अधिकाऱ्यांचा नाशिक दौरा होता. मात्र अशा पद्धतीने तपासणी होत असेल, तर भारत स्वच्छ कसा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भविष्य
निवडणूक
करमणूक
Advertisement