एक्स्प्लोर

Ujani Water Issue : प्रसंगी रक्त सांडू पण हक्काचा एक थेंबही देणार नाही, उजणीच्या पाणीप्रश्नावरुन स्वाभिमानी आक्रमक, पालकमंत्र्यांना इशारा   

राज्य सरकारने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. याविरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

Swabhimani Shetkari Sanghatana : पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतात. मात्र, हे पालकमंत्री जिल्ह्याला कुपोषित ठेवत आहेत. आमचा डोळा पालकमंत्र्यांच्या पदावर नाहीतर आमचा डोळा पाण्यावर आहे. आम्हाला आमच्या हक्काचे पाणी दिसत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजित बागल यांनी दिली आहे. प्रसंगी रक्त सांडू पण हक्काचं एक थेंबही जावू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लाकडी निंबोडी योजनेंतर्गत उजणीचे पाणी नेण्यास विरोध आहे. त्यामुळं आज पंढरपूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपरी याठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.

Ujani Water Issue : प्रसंगी रक्त सांडू पण हक्काचा एक थेंबही देणार नाही, उजणीच्या पाणीप्रश्नावरुन स्वाभिमानी आक्रमक, पालकमंत्र्यांना इशारा   

भरणे मामांना शेतकरी हिसका दाखवतील

पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याचा अपेक्षाभंग झाला आहे. भरणे मामांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोड बोलून 'मामा' बनवण्याचे काम केलं आहे. त्यांना जिल्ह्यातील शेतकरी निश्चित हिसका दाखवतील असा विश्वास देखील  यावेळी व्यक्त केला. उजणीचे पाणी देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. याविरोधात सोलापूरचे शेतकरी पेटून उठले आहेत. त्यांचा आवाज म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे. त्वरीत सरकारने हा निर्णय स्थगित करावा अन्यथा येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिली आहे. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजीराव बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते.

Ujani Water Issue : प्रसंगी रक्त सांडू पण हक्काचा एक थेंबही देणार नाही, उजणीच्या पाणीप्रश्नावरुन स्वाभिमानी आक्रमक, पालकमंत्र्यांना इशारा   

काय आहे ही योजना

राज्य सरकारने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या माध्यमातून उजणी धरणातून इंदापूर आणि बारामती तालुक्याला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील एकूण 17 गावासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. या सिंचन योजनेमुळे 7 हजार 250 हेक्टर अवर्षणप्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. यासाठी जवळपास 0.90 अब्ज घनफूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेसाठी 348 कोटी 11 लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किंमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि काही राजकीय लोकांचा विरोध आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 2.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 2.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maratha Reservation Row : समाज पक्ष? दादा अन् भुजबळ दक्ष! Special Report
Zero Hour Sarita Kaushik : विकासाचे राजकारण व्हावे पण विकासात राजकारण नको!
MSEDCL Strike | महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, 'Mahavitaran' ची 'Emergency' तयारी, रजा रद्द!
Crop Compensation | जुलै-ऑगस्ट Crop Damage: शेतकऱ्यांना ₹8500 मदत सुरू, KYC अट रद्द
Zero Hour Navi Mumbai Airport | 25 वर्षांच्या विलंबामुळे माफी मागा, BJP ची विरोधकांवर टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 2.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
बाप रे... चक्क खजुराच्या बिया काढून 2.78 कोटींचं कोकेन भरलं; मुंबई विमानतळावर तस्करी उघड, आरोपीला बेड्या
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
शिवसेना पक्ष अन् चिन्हाची सुनावणी, सुप्रीम कोर्टात आज काय घडलं; शिंदेंच्या खासदाराने सांगितलं, पुढची तारीख का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑक्टोबर 2025 | बुधवार
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
होय, निलेश घायवळच्या भावाला पडताळणीनंतरच शस्त्र परवाना दिला; गृहराज्यमंत्री योगेश कदमांची कबुली
Chhagan bhujbal: अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
अजित पवारांच्या नाराजीवर भुजबळ स्पष्टच बोलले, बाळासाहेब ठाकरेंचा दिला दाखला, जरांगेंवरही जोरदार हल्ला
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
साठवण तलाव मंजूर करा, ग्रामस्थ आक्रमक, बीडच्या केज तहसीलसमोर ग्रामस्थांनी पेटवली बैलगाडी
Navi Mumbai International Airport: ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
ऐनवेळी महायुती सरकारकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव; पीएम मोदी, सीएम फडणवीसांकडून भूमिपुत्राच्या संघर्षाचं स्मरण
Embed widget