एक्स्प्लोर

... तर मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेसाठी पाऊल ठेवू देणार नाही, 'भरणे हटाव मोहिमे'वरुन धनगर समाज आक्रमक

Ujani Dam News : उजनीच्या पाण्यावरून सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांना टार्गेट करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरु केला असल्याचा आरोप धनगर समाजानं केला आहे.

Ujani Dam Issue : उजनीचे पाणी (Ujani Water Issue) बारामती लोकसभा मतदारसंघात नेण्यात आले असून याला मंजुरी जलसंपदा मंत्र्यांनी दिली तर निधी अजित पवार यांनी दिला. मात्र या उजनीच्या पाण्यावरून धनगर समाजाचे असलेले आणि राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांना टार्गेट करून त्यांना हटवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे, असा आरोप धनगर समाजानं केला आहे. जर भरणे यांना पालकमंत्री पदावरून हटविले तर याची किंमत राष्ट्रवादीला चुकवावी लागणार असून आषाढी पूजेला येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये पाऊल ठेऊ देणार नसल्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे. पंढरपूर येथे झालेल्या धनगर समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

उजनीच्या पाण्यावरून सुरु झालेला वाद आता चांगलाच पेटू लागला असून यात आता जातीचे राजकारण देखील होऊ लागले आहे. उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला पळविल्याचा आरोप करत सोलापूर जिल्ह्यातून तीव्र संघर्षाला सुरुवात झाली आहे. यातच काही राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्री भरणे यांना जबाबदार धरून त्यांना हटवण्याचा उद्योग करत असल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे. 

उजनीच्या पाण्यावरून सोलापुरात राजकारण तापले असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हटाव अशी भूमिका काँगेस, भाजपमधून सुरु असताना त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ही कुरघोड्या करत असल्याचा आरोप धनगर समाजाने पंढरपूरमध्ये पार पडलेल्या बैठकीत केला आहे.

महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतके धनगर समाजातील आमदार असून त्यांना राजकारणातून बाहेर काढण्याचा हा कुटील डाव असल्याचा आरोप यावेळी धनगर नेत्यांकडून करण्यात आला.  जर का दत्तात्रय भरणे यांना सोलापूर पालकमंत्री पदावरून जर हटवले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढी वारीला महापूजेला पंढरपूरमध्ये येऊ देणार नाही, असा पवित्रा धनगर समाज संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाने घोषणाबाजी देखील करण्यात आली. 

जर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवण्याचा निर्णय राज्य सरकार करत असेल तर आमचा विरोध असेल. असं झालं तर संपूर्ण धनगर समाज बारामतीमध्ये जाऊन आंदोलन करेल, असा इशारा देखील दिला आहे. आजवर अजित पवार यांना बारामतीमध्ये धनगर समाजाने साथ दिली आहे. मात्र हा निर्णय घेतल्यास धनगर समाज निवडणुकीत आपली ताकद दाखवेल, असा इशाराही अजित पवार यांना दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Embed widget