एक्स्प्लोर

सुप्रिया सुळे राज्यात संवाद दौरा करणार तर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडून खड्ड्यांविरोधात विशेष अभियान

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात विविध पक्षांच्या यात्रांचे पीक आले आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्याची भर पडणार आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात विविध पक्षांच्या यात्रांचे पीक आले आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्याची भर पडणार आहे. सुप्रिया सुळे राज्यात संवाद दौरा करणार आहेत. 23 ऑगस्टपासून या दौऱ्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. ह्यात सहा जिल्ह्यात सुप्रिया सुळे संवाद साधणार आहेत. राज्यातील पूरपरिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सरकारचा ढिसाळ कारभार या पार्श्वभूमीवर  जिल्ह्यांतील विविध घटकांशी संवाद साधण्यासाठी सुप्रिया सुळे यांचा दौरा असल्याची माहिती आहे. संवाद दौर्‍याच्या पहिल्या टप्प्यात 23 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यात सुप्रिया सुळे फिरणार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने याआधी शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे फिरत असताना मात्र सुप्रिया यांचा वेगळा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा आहे. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे. यासाठी शिवस्वराज्य यात्रेनंतर सुप्रिया सुळे यांचा संवाद दौरा सुरू होणार आहे. 'मुंबई बन गई खड्डे का अड्डा', आजपासून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे विशेष अभियान   'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' हे नवीन विशेष अभियान मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस राबविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.   'मुंबई बन गई खड्डे का अड्डा' या नावाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खड्ड्यांचे फोटो काढून महापालिकेला टॅग करणार आहेत. त्यातील किती खड्डे बुजवले, नाही बुजवले हे प्रश्न मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विचारणार आहे असेही नवाब मलिक म्हणाले. #KhaddeKaAdda #MumbaiPotholes या हॅशटॅग खाली हे अभियान राबवण्यात येणार आहे. जनतेने या मोहिमेत सामील झाले पाहिजे असे आवाहनही नवाब मलिक यांनी यावेळी केले.  मुंबई महानगरपालिकेने 400 ते 500 खड्डे मुंबईत असल्याचा दावा केला होता. मात्र मुंबईत 25 हजारच्या आसपास खड्डे आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. आजपासून महापालिकेला टॅग करण्याचे अभियान सुरू होणार आहे. यामुळे खड्ड्याचे सोशल ऑडिट पण होईल. ही मोहीम जोपर्यंत मुंबईतील खड्डे बुजत नाही तोपर्यंत सुरू राहणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन सुरु करत आहोत. जर कारवाई झाली नाही तर वॉर्डनुसार आंदोलन करू असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

Embed widget