एक्स्प्लोर

काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे; सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना भावनिक आवाहन

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळं पूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. मात्र, हा धक्का सर्वात जास्त पवार कुटुंबाला बसला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रीया सुळे यांनी अजित पवारांना भावनिक आवाहन केले आहे.

मुंबई : सत्तेसाठी कुटुंबात फाटाफूट नको, तू काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजित पवार यांना केले आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, राष्ट्रवादी आणि त्यात पवार कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जातोय. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रावादीने संयुक्त परिषद घेत आपली भूमिका मांडली. यात अजित पवारांचा निर्णय हा वैयक्तीक असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. आपल्या कुटुंबाचा आत्तापर्यंतचा प्रवास महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु, त्यावर तोडगा काढू. तू पहिल्यांदा राजीनामा दे आणि परत ये, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मात्र, यावर अजित पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली हे समजू शकले नाही. आज सकाळी अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. या अनपेक्षित आणि धक्कादायक प्रकारानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी पूर्णपणे गोंधळलेले आहेत. अजित पवार यांच्या तडकाफडकी निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांची समजूत काढण्यासाठी श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी घेले होते. मात्र, त्यांना अजित पवरांची समजूत काढण्यात अपयश आल्याचे सांगण्यात येत आहे. उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला असा निरोप अजित पवारांनी शरद पवारांना आमदारांकरवी पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपासोबत चला - राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटण्यापासून वाचवायचा असेल तर भाजपसोबत चला असा निरोप अजित पवार यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी गेलेल्या आमदारांमार्फत शरद पवार यांना पाठवला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सकाळी शिवसेनेसोबत संयुक्त पत्रकार परिषद घेत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांचा हा वैयक्तीक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांच्यावर कारवाई करण्याचेही त्यांनी संकेत दिले. दरम्यान, सध्या वाय. बी. चव्हाण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची बैठक सुरु आहे. यावेळी अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार परतल्याचे पाहायला मिळाले. संबंधिक बातम्या - असा घडला पॉलिटिकल ड्रामा, पाहा संपूर्ण घटनाक्रम काँग्रेसकडून शरद पवारांना क्लीनचिट; सोनिया गांधी म्हणाल्या पवारांवर पूर्ण विश्वास - सुत्र अजित पवारांच्या समर्थनातून राज्याला मजबूत सरकार देणार, शपथविधीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget