(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : माझ्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी, पण तरीही आम्ही चर्चेसाठी तयार; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
माझ्या घरावर हल्ला झाला असून त्यातून मला सावरु द्या, आजही आम्ही संपकऱ्यांशी चर्चा करायला तयार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मुंबई: माझ्या घरावर झालेला हल्ला हा दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ही अशी पहिलीच घटना असेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घराच्या परिसरात अचानक येऊन आंदोलन केलं. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ही अशी पहिलीच घटना घडली असेल. माझ्या घरावर जो हल्ला झाला तो अत्यंत दुर्दैवी आहे. पण तरीही आम्ही आंदोलन करणाऱ्या आंदोलकांशी चर्चा करायला तयार आहोत. या गोष्टी आंदोलन करुण किंवा चप्पल फेकून सुटणाऱ्या नाहीत, या गोष्टी केवळ चर्चेच्या माध्यमातून सुटतील.
शरद पवारांच्या मुंबईतील घरासमोर घडलेल्या या घटनेनंतर सुप्रिया सुळे आंदोलकांना सामोरं गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी अनेकवेळा चर्चा करु असं आवाहन आंदोलकांना केलं होतं. पण आंदोलक काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यानंतर सुप्रिया सुळे या घरामध्ये गेल्या.
आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यानंतर आपल्या कुटुंबियांचे संरक्षण केल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले.
आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. यावेळी त्या घरामध्ये शरद पवारांच्या पत्नी आणि नात असल्याचं सांगितलं जातंय.
महत्त्वाच्या बातम्या:
- ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक
- ST Strike : शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन; राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश आहे का?
- ST Workers Protest: सुप्रिया सुळे चर्चेसाठी आल्या पण कर्मचारी आक्रमक