एक्स्प्लोर

Rohit Pawar Vs Sunil Tatkare : 'दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी'; रोहित पवारांचा तटकरेंवर निशाणा

Rohit Pawar Vs Sunil Tatkare : मागील काही दिवसांपासून रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे असा वाद पाहायला मिळत असून, दोनी नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

Rohit Pawar Vs Sunil Tatkare : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून एकमेकांना आरोप-प्रत्यारोप करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात अजित पवार गटाचे (Ajit Pawar group) नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar group) आमदार रोहित पवारांमध्ये (Rohit Pawar) जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून (Hadapsar Assembly Constituency) भाजपची उमेदवारी (BJP Candidate) मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अशी टीका तटकरे यांनी केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देतांना " दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली, त्याप्रमाणे अजितदादांचीही साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. 

तटकरे यांच्यावर टीका करतांना रोहित पवार म्हणाले की, “तटकरे साहेब तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची भीक मागणारा आणि विचारांशी गद्दारी करणारा मी नाही. भाजपमध्ये जायचंच असतं तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे भाजपची आरती गात बसलो असतो. आता ज्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली त्याप्रमाणे अजितदादांचीही साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय? तेवढं सांगा, मी जे बोलतो ते पुराव्यासह बोलतो. आणि अजूनही बोलायला भाग पाडलं तर अनेकांना ते परवडणार नाही,” असे रोहित पवार म्हणाले. 

काय म्हणाले होते तटकरे? 

माझ्याबद्दल वक्तव्य करणारे रोहित पवार हे 2019 मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुणाच्या मार्फत आपल्या वडिलांना घेऊन विनवण्या करत होते. या बाबतची माहिती आमच्याकडे आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे हे महाशय कर्जत जामखेड विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा देऊन, भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी आपल्या वडिलांसह कुणाला घेऊन किती वाट पाहत होते हे मला माहित आहे. अशा बालबुद्धी असलेल्या व्यक्तीबद्दल मला फारसं काही बोलायचं नाही, असे तटकरे म्हणाले होते.

असा सुरु झाला रोहित पवार विरुद्ध सुनील तटकरे वाद...

मागील काही दिवसांपासून रोहित पवार सत्ताधारी पक्षांवर भ्रष्टाचारचे आरोप करतायत. यावेळी त्यांचा रोख अजित पवार गटाच्या नेत्यांकडे आहे. यावर बोलतांना सुनील तटकरे यांनी रोहित पवारांचा बालवाडीचे अध्यक्ष म्हणून उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देतांना 'सुनील तटकरे सिंचनाच्या चिखलात अडकलेले नेते असून, भाजपात सर्वात आधी कुणी जाणार असेल तर ते सुनील तटकरे असतील,' असे रोहित पवार म्हणाले. आता त्यांच्या याच टीकेला उत्तर देतांना '2019 मध्ये रोहित पवार हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते,' असे तटकरे म्हणाले. आता तटकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देतांना 'दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी' असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे. आता यावर सुनील तटकरे काय बोलतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

रायगडमधील महायुतीच्या नाराजीनाट्यावर पडदा, तटकरेंच्या 'त्या' एका आश्वासनाने तिढा सुटला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वरVarsha Bunglow Meeting : शपथविधीआधी महत्वाच्या खात्यासंदर्भात ठोस निर्णय? 'वर्षा'वर खलबतंDevendra Fadnavis Maharashtra Vidhansabha : भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड, देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Embed widget