एक्स्प्लोर
Advertisement
सुजय विखेंच्या नावापुढे निकालापूर्वीच खासदारपद, लग्नपत्रिका वायरल
लग्नपत्रिकेत सुजय विखे यांचं नाव छापण्यात आलं आहे. मात्र त्यांचा उल्लेख 'संसद सदस्य भारत सरकार' असा करण्यात आल्याने ती सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली आहे.
मुंबई : ग्रामीण भागातील लग्नांमध्ये आमदार, खासदार आणि राजकीय नेत्यांची उठबस हा प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. लग्नातील अशा प्रमुख पाहुण्यांची वर्दी लग्नपत्रिकेतूनच मिळते. अशाच एका पत्रिकेत लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार सुजय विखे यांच्या नावापुढे निकालाआधीच खासदारपद चिकटवण्यात आलं आहे.
अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यात येत्या 8 मे रोजी हा विवाह होणार आहे. या लग्नपत्रिकेत सुजय विखे यांचं नाव छापण्यात आलं आहे. मात्र त्यांचा उल्लेख 'संसद सदस्य भारत सरकार' असा करण्यात आला आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाली आहे.
माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना मैदानात उतरवून सुजय यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा या मतदारसंघातील निकालाकडे लागल्या आहेत. विखे समर्थकांनी मात्र आधीच आपल्या पद्धतीने निवडणुकीचा निकाल लावून टाकला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
मुंबई
ठाणे
Advertisement