एक्स्प्लोर

मंत्री गडाख यांच्या संस्थेतील कर्मचाऱ्याची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी व्हिडीओ व्हायरल, 7 जणांविरुद्ध गुन्हा

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

अहमदनगर : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळेस नगर औरंगाबाद रोडवर प्रतीक याने आत्महत्या केली असून या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संस्थेतील 7 जणांविरोधात अहमदनगरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 जणांना पोलिसांनी अटक केलीय. प्रतीक काळे याने काही वर्ष प्रशांत गडाख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिल्याची देखील प्राथमिक माहिती आहे.

अहमदनगर मधील प्रशांत गडाख यांच्या दंत महाविद्यालयात काम करणाऱ्या प्रतीक काळे याने तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद रोडवर आत्महत्येपूर्वी व्हिडीओ व्हायरल करत व सोशल माध्यमांवर पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.  प्रतीक काळे या 27 वर्षीय तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता.

 गडाख यांच्यासह सर्वांची चौकशी करा- मुरकुटे
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं होतं तर या आंदोलनाला नेवासा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील पाठिंबा दिला होता. प्रतीक काळे याने सोशल माध्यमांवर केलेल्या सुसाईड नोटच्या आधारे चौकशी होऊन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुरकुटे यांनी केली आहे.

गडाख कुटुंबाचा काहीही संबंध नाही, प्रतीकच्या बहिणीची माहिती 
 घटनेनंतर मयत प्रतीक काळे यांच्या बहिणीच्या फिर्यादीवरून संस्थेतील 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यात गडाख कुटुंबाचा काहीही संबंध नसल्याचं बहिणीने स्पष्ट केलं आहे. त्याने व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप दारूच्या नशेत केली असल्याचं बहिणीने सांगितले. प्रतीकने मला आत्महत्येपूर्वी फोनवर सगळं सांगितले होते. त्यामुळे यात गडाख दोषी असते तर आम्ही सोडलं नसतं असं सांगताना कोणीही राजकारण  करू नये असं प्रतीक्षा हिने स्पष्ट केलं आहे. 

एकीकडे सोशल माध्यमात व्हायरल झालेला व्हिडिओ व पोस्ट यावरून गडाख विरोधक गडाख यांच्या वर कारवाई करण्याची मागणी करत असताना दुसरीकडे बहिणीने राजकारण न करण्याच आवाहन केलं आहे. त्यामुळे आत्महत्येमागे नेमकं कारण काय हे पोलीस तपासात पुढे येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget