एक्स्प्लोर
सांगलीत नदीकाठच्या ग्रामस्थांचं अजब धाडस, मगर खांद्यावर उचलून नेत वन विभागाला सोपवली
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील साटपेवाडीमधील ग्रामस्थांनी अजब धाडस केलं. मगर चक्क खांद्यावरुन उचलून नेली. अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी हे धाडस केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

सांगली : सांगली जिल्ह्यात सध्या वाळवा तालुक्यातील साटपेवाडी येथील ग्रामस्थांनी केलेल्या अजब धाडसाची चर्चा रंगली आहे. कृष्णा नदीकाठी आढळून आलेली मगर ग्रामस्थांनी चक्क खांद्यावर उचलली आणि मग ती वनविभागाकडे सुपूर्द केली. कोणताही अनुचित प्रकार आणि दुर्घटना टाळण्यासाठी ग्रामस्थ आणि युवकांनी हे धाडस केलं.
कृष्णेच्या काठी मोठ्या प्रमाणावर अजस्त्र मगरीचे दर्शन होत असल्याने नदीकाठच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरलेलं होतं. साटपेवाडी येथे ग्रामस्थांना सोमवारी (25 जानेवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तब्बल दहा ते बारा फूट अजस्त्र मगरीचे दर्शन झाले. यानंतर ग्रामस्थांनी आणि गावातील युवकांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद केलं. यानंतर चक्क खांद्यावरुन मगर नेत वनविभागाच्या हवाली केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
दरम्यान कृष्णा नदीच्या पात्रात मगरींचा वावर आहेच. पण नदीच्या काठी मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी नदी काठाला लागून असलेल्या शेतात शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन काम करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी मगरीच्या नैसर्गिक अधिवासापासून दूर राहण्याचे आवाहन वन विभागाच्यावतीने यावेळी करण्यात आले आहे.

आणखी वाचा
Advertisement
Advertisement