Gudhipadva Festival 2021 : गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली
गुढीपाडवा सण म्हटलं की मिरवणुका, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी हे दरवर्षी ठरलेले असतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी राज्य सरकारने काही नियमांनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
Gudhipadva Festival 2021 : मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. मात्र यंदा कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले. राज्य सरकारने त्यासाठी एक नियमावली देखील जाहीर केली आहे.
गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली
गुढीपाडवा सण म्हटलं की मिरवणुका, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मित्र मैत्रिणींच्या भेटीगाठी हे दरवर्षी ठरलेले असतं. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेकजण एकत्र जमतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही नियमांनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. सरकारच्या नियमावलीनुसार सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित आहे. कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.
Maharashtra Lockdown: लॉकडाऊनची मानसिकता ठेवा! घोषणेआधी जनतेला पूर्वसूचना देणार : राजेश टोपे
राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आज अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.