ST Workers Strike : कुणाला पगार, कुणाला 'मेस्मा'? आज बैठक, एसटी संपकऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाईची शक्यता
ST Workers Strike : कामावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारीत वेतनवाढीनुसार पगार होणार असून तर संपकऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
![ST Workers Strike : कुणाला पगार, कुणाला 'मेस्मा'? आज बैठक, एसटी संपकऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाईची शक्यता ST Workers Strike Update Mesma meeting today possibility of action under Mesma on ST employees ST Workers Strike : कुणाला पगार, कुणाला 'मेस्मा'? आज बैठक, एसटी संपकऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाईची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/28/5ed38fd224bc810e7861854493cf5a2e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ST Workers Strike : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. एसटी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखण्याचा निर्णय आता एसटी महामंडळानं घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र जे कर्मचारी अजूनही संपावर अडून आहेत त्यांच्यावर मेस्मा लावण्यासंदर्भातचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज कामावर हजर झालेल्या 19 हजार कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतनवाढीनुसार पगार होणार आहेत. तर इतर संपकरी कर्मचाऱ्यांचे मात्र पगार आता थांबवले जाणार आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत कामावर हजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज सुधारित वेतनवाढीनुसार पगार मिळणार आहे. राज्यातील जवळपास 19 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार आज पगार होणार आहे. तर संपकरी कर्मचाऱ्यांना मात्र पगाराला मुकावं लागणार आहे. संपकऱ्यांवर मेस्मा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, अशी सध्याची परिस्थिती आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज मेस्माची बैठक होणार असून या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
पाहा व्हिडीओ : कामावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारीत वेतनवाढीनुसार पगार होणार
आज मेस्माची बैठक
काही दिवसांपूर्वीच संप मागे घ्या अन्यथा कठोर करवाई करू असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे. तर मेस्माचा निर्णय कॅबिनेट बैठकीत होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांबाबत कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. मेस्माबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह इतर मंत्र्यांचा सल्ला परिवहनमंत्री घेणार आहेत. मेस्मा लावल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात? याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे.
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर कारवाईला सुरुवात होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे एसटी महामंडळानं मेस्मा कारवाई सुरु केली तर कोणत्याही नोटिशीविना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना अटक होऊ शकते. तसंच कायद्यानुसार, एक वर्षाचा कारावासही होण्याची शक्यता आहे. दरम्यान, संपकऱ्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई आता मागे घेण्यात येणार नाही, असंही परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केलं होतं. कारवाईत संपात सहभागी कुटुंब सुरक्षा योजनेंतर्गत घेतलेल्या जवळपास 6 हजार एसटी कर्मचाऱ्यांवर पहिली कुऱ्हाड कोसळणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कुटुंब सुरक्षा योजनेतील जवळपास 6 हजार वाहकांची सेवा समाप्त होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन
आतापर्यंत तब्बल 10 हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर तब्बल 2 हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना दगडफेकीच्या घटनांना सामोरे जावं लागतंय, दुसरीकडे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावं लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)