एक्स्प्लोर

ST Workers Strike : अद्याप तोडगा नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावरील बैठक निष्फळ

संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला  आहे.कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघालेला नाही.  एसटी कर्मचाऱ्यांचं शिष्टमंडळ आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.  एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळात गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचारी  होते. शिवाय परिवहन मंत्री अनिल परबही या बैठकीला उपस्थित  होते. या बैठकीनंतर एसटी संपावर तोडगा निघालेला नाही. संप मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेतला  आहे. कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, एसटी कर्मचार्‍यांच्या विविध समस्यांबाबत आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी सुद्धा चर्चा केली. फार काळ संप सुरू राहणे चांगले नाही, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून या समस्या निकाली काढाव्यात, आम्ही मदत करू

गोपीचंद पडळकर म्हणाले, जोपर्यंत  विलीनीकरण होत नाही तोवर आम्ही माघार घेणार नाही. काल एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे
सरकार निलंबनाची भीती दाखवत आहे. आजच्या बैठकीत फडणवीस यांनी कशा पद्धतीने तोडगा निघू शकतो याचे मार्गदर्शन अनिल परब यांना केले आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही.  या कर्मचाऱ्यांचा घात शरद पवार यांनी केला आहे.

एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

कोरोनामुळे नियुक्त्या रखडलेल्या एसटी महामंडळातील 3 हजार 500 कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.  2019 साली सरळसेवा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या चालक तथा वाहक आणि सहाय्यक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारची नियुक्त्या रखडलेल्या कर्मचाऱ्यांना संधी देण्याची तजवीज सुरू असल्याची माहिकी 'एबीपी माझा'ला एसटी महामंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. तर एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. कर्मचारी कामावर आले नाहीत तर नव्या कामगारांना कामावून घेण्याचे  स्पष्ट संकेत अनिल परब यांनी दिले आहे.

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

 

संबंधित बातम्या :

भरतीतील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या पर्यायाचा विचार, एसटीच्या कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांचा इशारा

ST Workers Strike : बुलडाण्यातील विष घेतलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, महामंडळाच्या अल्टिमेटमनंतरही आंदोलन सुरुच

ठाकरे सरकारला जागे करण्यासाठी लढा आणखी तीव्र करावा लागेल; केंद्रीय मंत्री रामदास आठवले

महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Beed Crime News: ‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
‘पप्पा, मम्मीला मारू नका...’; मुलाची विनवणी ऐकली नाही, पतीने पेट्रोल ओतून पत्नीला पेटवलं; बीडमधील मन सुन्न करणारी घटना
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Embed widget