एक्स्प्लोर

ST Workers Strike Live Updates : लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन, वाचा प्रत्येक अपडेट

Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे. आपल्या मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झालेत

Key Events
ST Workers Strike Live Updates Today maharashtra state road transport corporation employee protest Live ST Workers Strike Live Updates : लालपरी ठप्प! ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन, वाचा प्रत्येक अपडेट
live_blog_(3)

Background

ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या  दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं.

आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघणारआहे. यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत. एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.

तर दुसरीकेडे एस.टी. कर्मचारी संपाविरोधात महामंडळ आज अवमान याचिका हायकोर्टात सादर करणार आहेत. एकंदरीतच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाही.

दरम्यान, राज्य सरकारने आता थेट एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात आत्तापर्यंत 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार जिल्ह्यात निलंबनाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई झाली तरी संप सुरूच ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतलीय.

राज्यभरातील 16 विभागातील 45 आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातल्या 18 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. 31 ऑक्टोबर रोजी गणेशपेठ बस स्थानकावर या कर्मचाऱ्यांनी काही राजकीय कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केलं होतं त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. तर चंद्रपूर जिल्ह्यातील 14  संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचं प्रशासनाकडून निलंबन करण्यात आलंय. तर नाशिक विभागातील कळवण आगारातील 17 कर्मचारी, वर्धा विभागातील 40 कर्मचारी, गडचिरोली विभागातील 14 कर्मचारी, लातुर विभागातील 31 कर्मचारी, नांदेड विभागामधील आगारातील 58 कर्मचारी, भंडारा आगारामधील 30 कर्मचारी, सोलापुर विभागातील अक्कलकोट आगारामधील २ कर्मचारी, यवतमाळ विभागातील 57 कर्मचारी, औरंगाबाद विभागातील औरंगाबाद-१ आगारातील पाच कर्मचारी, परभणी विभागातील आगारातील 10 कर्मचारी, जालना विभागातील जाफ्राबाद व अंबड आगारातील 16 कर्मचारी, जळगाव विभागातील अंमळनेर आगारातील चार कर्मचारी, धुळे विभागातील धुळे आगारातील दोन कर्मचारी, सांगली विभागातील जत, पलुस, इस्लामपुर,आटपाडी आगारातील 585 कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

संबंधीत बातम्या

ST workers Strike : आंदोलनकर्त्या एसटी कामगारांविरोधात कारवाईचा बडगा; 376 कर्मचारी निलंबित

BLOG : 'लालपरी'च्या सेवकांची फरफट अन् दमनकारी सरकारे!

St workers strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; लोकांना वेठीस धरू नये; अनिल परब यांचे आवाहन

14:30 PM (IST)  •  10 Nov 2021

संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक

एसटी संपासंदर्भात एस टी कर्मचारी संयुक्त कृती समिती आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची बैठक सायंकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर कॅबिनेट बैठकीनंतर होणार

14:27 PM (IST)  •  10 Nov 2021

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एसटी संपाला पाठिंबा, मात्र महामंडळ विलीन करण्याची मागणी अवास्तव

राज्यमंत्री बच्चू कडू यांचा एसटी संपाला पाठिंबा 

मात्र महामंडळ विलीन करण्याची मागणी अवास्तव

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ एसटी कामगारांनाही मिळावेत

पण महामंडळ एक विलीन केलं तर बाकीच्या बाबत सुद्धा अशाच मागण्या सुरू होतील

प्रहार संघटनेच्या माध्यमातून लवकरच अनाथ विधवा, दीनदुबळे यांच्यासाठी संवाद यात्रा

पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावापासून ही संवाद यात्रा सुरू करणार

तीनशे किलोमीटरच्या या संवाद यात्रेतून मिळणारा फीडबॅक सरकारपर्यंत पोहोचवणार

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Embed widget