एक्स्प्लोर

ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु, वाचा प्रत्येक अपडेट

Maharashtra ST Workers Strike : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरु आहे. काही ठिकाणी मात्र सेवा सुरु झाली आहे. पाहा यासंबंधीचे प्रत्येक अपडेट्स...

LIVE

Key Events
ST Strike Live : बहुतांश एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम, काही ठिकाणी सेवा सुरु, वाचा प्रत्येक अपडेट

Background

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यात बहुतांश ठिकाणी अजूनही सुरुच आहे. कोल्हापूर जिल्हा आणि अन्य काही ठिकाणी संरक्षणात एसटी सेवा सुरु केली जात आहे. दुसरीकडे आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे..गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय..कर्मचाऱ्यांना भीती दाखवू नका, असं म्हणत सदावर्ते यांनी अनिल परबांना इशारा दिलाय. कोल्हापूरमधल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थगित केलं आहे. त्यामुळे आज कर्मचारी कामाव हजर होणार असून  एसटीची सेवा सुरळीत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वेतनवाढीनंतरही संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतरही संप सुरु ठेवणार असाल तर दिलेल्या पगारवाढीचाही विचार करावा लागेल असं अनिल परब म्हणालेत..एसटी महामंडळानं ५०० कंत्राटी कामगारांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतलाय..तसेच जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांचं निलंबन केलं जाणार आहे. याशिवाय हा संप बेकायदेशीर ठरविण्यासाठी राज्य सरकार कामगार न्यायालयातही गेलंय... पगारवाढ मूळ वेतनात दिल्यानं ग्रेडवर काही
फरक पडेल का यावरही चर्चा झाल्याचं मंत्री अनिल परब यांनी सागितलं आहे. सातवा वेतन आयोग देऊन करार १० वर्षांचा करण्याचा विचार करु असंही अनिल परब यांनी म्हटलं आहे. 

कामगारांचं नेतृत्व कोणं करतंय याचं देणं घेणं नाही, कोर्टात जे आमच्या समोर आले आहेत त्यांचा विषय आम्ही कोर्टात बघू, असं आव्हान नाव न घेता परिवहन मंत्री अनिल परब यांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना दिलं आहे.  कारवाई दररोज सुरू आहे. आज आम्ही रोजदरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा आम्ही समाप्त केली आहे. 500 कर्मचारी जे रोजंदारीवर आहेत त्यांची सेवा आम्ही सेवा समाप्त केली, असंही परब यांनी सांगितलं. 

... तर पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करणार; अनिल परबांचा इशारा 
कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतरही, पैसे दिल्यानंतरही संप जर चालू राहणार असेल तर त्याचा काही अर्थ नाही. त्यामुळे राज्य सरकार बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. महत्वाच्या मागण्या पूर्ण केल्याने आता कामगारांनी संप मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं.  पैसे देऊन संप सुरू करण्यापेक्षा पैसे न देता संप सुरू राहणार असेल तर याबाबत देखील विचार होणार आहे, असंही ते म्हणाले. 

परब म्हणाले की, विलीनीकरणाबाबत चर्चा झाली. मी मागील काही दिवसांपासून नेमकी बाब समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. एका बाजूला पगारवाढ दिली. ही पगार वाढ देताना एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आम्ही दिला आहे. हायकोर्टाचा अहवाल आल्यानंतर विलीनीकरणाबाबतची भूमिका देखील स्पष्ट होणार आहे, असं ते म्हणाले. 

एसटी सेवा बंद राहणं हे राज्याच्या हिताचं नाही, प्रवाशांचीही गैरसोय होते तसेच कर्मचाऱ्यांच्याही हिताचं नाही, त्यामुळे संपकऱ्यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन अनिल परबांनी केलं आहे. संपकऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर नाईलाजास्तव पगारवाढीच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल, तसेच कारवाईचा बडगा उचलावा लागेल असंही ते म्हणाले. 

पैसे देऊनही संप चालू राहणार असल्यास काही अर्थ राहणार नाही
अनिल परब म्हणाले की, "महाराष्ट्र सरकार चार पाऊल पुढे आलं असून यावर आता संप करु नये. विलिनीकरणाचा मुद्दा हा हायकोर्टात असून एसटी कर्मचाऱ्यांनी कामगारांनी कामावर रुजू व्हावं. पगार वाढ केल्यांतरही काही कर्मचारी संप करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या बेशिस्तपणा खपवून घेतली जाणार नाही. पैसे देऊनही संप चालू राहणार असल्यास काही अर्थ राहणार नाही."

राज्य सरकारने पगारवाढ झाल्यानंतर अनेक कामगार कामावर रुजू झाले. या दरम्यान कृती समितीशी चर्चा करुन या बाबतीतचे कामगारांचे प्रश्न आणि एसटी सेवा सुरळीत करण्यासाठी काय उपाययोजना केली जावी यासाठी ही बैठक असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेणार असल्याचं अनिल परबांनी स्पष्ट केलं. 

13:20 PM (IST)  •  27 Nov 2021

 गुहागर बस स्थानकातून पहिली बस फेरी सुरू

 गुहागर बस स्थानकातून पहिली बस फेरी सुरू, संप पुकारल्यानंतर पहिल्यांदाच गुहागर चिपळूण बस फेरी सुरू.

कारवाईच्या भीतीने आठ कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती.

गुहागरमधून सुटलेली पहिली बस मनसेने रस्त्यात अडवली.

जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बस फेरी सुरू करून देणार नाही - मनसेची आक्रमक भूमिका..

11:05 AM (IST)  •  27 Nov 2021

बीड आगारातून पहिली एसटी निघाली

बीड आगारातून पहिली एसटी निघाली आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बीड ते गेवराई पहिली बस निघाली. सहा प्रवाशांनी केला पहिला प्रवास.. केवळ दोनच कर्मचारी कर्तव्यावर हजर. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. 

08:53 AM (IST)  •  27 Nov 2021

सांगली : जिल्ह्यातील 10 डेपोंमधून जिल्हाअंतर्गत बसच्या 301 फेऱ्या सुरू

सांगली : जिल्ह्यातील 10 डेपोंमधून जिल्हाअंतर्गत बसच्या 301 फेऱ्या सुरू, काल रात्रीपर्यंत 1817 कर्मचारी कामावर रुजू, यामध्ये चालक 427 वाहक 397 कार्यशाळा कर्मचारी 517 तर प्रशासकीय कर्मचारी 482 ड्युटीवर रुजू झालेत

08:40 AM (IST)  •  27 Nov 2021

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर डेपो वगळता जिल्ह्यातील इतर कोणत्याही डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर डेपो वगळता जिल्ह्यातील इतर कोणत्याही डेपोमधून एकही बस बाहेर पडलेली नाही , कर्मचारी विलीनीकरण मुद्द्यावर  ठाम

07:54 AM (IST)  •  27 Nov 2021

औरंगाबाद  जिल्ह्यात शिवनेरी वगळता एकही बस धावली नाही

औरंगाबाद  जिल्ह्यात शिवनेरी वगळता एकही बस धावली नाही. काल पर्यंत 11 कर्मचारी कामावर रुजू झाले 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिकल सर्विस लि. येथे नोकरीच्या संधी ABP MajhaKaruna Sharma On Dhananjay Munde :  संपूर्ण विषयावरुन लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सगळं सुरु:करुणा मुंडेEknath Shinde On Uddhav Thackeray  : खोके-खोके म्हणणाऱ्यांना जनतेनं खोक्यात बंद केलं : एकनाथ शिंदेBhaskar Jadhav On Shivsena : शिवसैनिक नावाच्या निखाऱ्यावर साचलेली राख झटकावी : भास्कर जाधव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
माजी मुख्यमंत्र्यांचा साधेपणा; कुंभमेळ्यातील रेल्वे स्टेशनच्या कठड्यावर ट्रेनची वाट पाहातानाचा व्हिडिओ व्हायरल
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
... तर आम्ही नीटसुद्धा करू शकतो; धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा आ. सुरेश धसांना थेट इशारा
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
धक्कादायक! जळगावमध्ये पोलिसाचे अपहरण, 4 तासांच्या थरारानंतर सुटका; जिल्ह्यात उडाली खळबळ
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
मोठी बातमी! ती कुस्ती पुन्हा होणार? महाराष्ट्र केसरीतील अंतिम लढतीची फेरतपासणी, 5 जणांची समिती
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
जितेंद्र आव्हाडांनी दिला 'छावा' चित्रपटाचा रिव्ह्यूव; सिनेमातील 'या' सीनचा अभ्यास मराठी माणसांनी करावा
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
उद्धव ठाकरेंसोबतची बैठक संपताच भास्कर जाधवांवर बोलले अंबादास दानवे; धनंजय मुंडे-धस भेटीवरही टोला
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
महाराष्ट्रात 'छावा' चित्रपट टॅक्स फ्री करावा; महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याची मागणी, सरकारला विनंती
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कारचा रिक्षाला स्पर्श होताच सॉरी म्हणून पुढे गेले, तरीही रिक्षाचालक पाठलाग करुन आला, बेदम मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.