कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 50 लाखांची मदत, परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
कोरोनाच्या संकटात एसटीचा खुप मोठा आधार अनेकांना मिळाला आहे. मात्र या संकटात एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या अथवा कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून 50 लाखांनी मदत मिळणार आहे.
धुळे : कोरोनाच्या संकटाच्या काळाचा राज्य परिवहन मंडळ महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. अशा कठीण स्थितीत अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांसाठी असो की पर राज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यापर्यंत सोडण्यासाठी असो, हे एसटीचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपली ड्युटी करत आहे. मात्र दुर्दैवानं कोरोना व्हायरसची लागण होऊन एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना देखील 50 लाखाची मदत जाहीर करत असल्याची घोषणा एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी आज मुंबईत केली.
एसटीचा आज 72 वा वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एसटीच्या अधिकारी , कर्मचारी , कामगार यांना शुभेच्छा देतांना अनिल परब यांनी ही घोषणा केली आहे. आर्थिक संकटात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करावं, तसेच कोरोनाची लागण झालेल्या अथवा कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर आर्थिक मदत मिळावी अशी, मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली होती. अखेरीस कर्मचाऱ्यांच्या दोन पैकी एका मागणीवर सकारात्मक निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'चा आज वाढदिवस, महाराष्ट्रात धावलेल्या पहिल्या एसटीची रंजक कहाणी
याबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, कोरोनाच्या संकटात एसटीचे सर्व कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र दुर्दैवाने जर कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास महाराष्ट्र परिवहन राज्य मंडळाकडून 50 लाखांची मदत केली जाईल. कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीत काम करत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात सतत भीतीचं वातावरण असतं. या भीतीच्या वातावरणातून या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम आमचं आहे. या कोरोनाच्या संकटातून आपण एकजुटीने मार्ग काढू, असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या विदर्भातील सर्व कोरोना योद्ध्यांची चाचणी करा : हायकोर्ट
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी, मजुरांसह सूक्ष्म, लघु अन् मध्यम उद्योगांसाठी मोठ्या घोषणा
Union Cabinet Meeting | केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकरी आणि MSME साठी कोणत्या योजना जाहीर केल्या आहेत?