एक्स्प्लोर
SSC Result | दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही
दहावी एसएससी बोर्डाचा निकाल सात जूनला जाहीर होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वायरल झाल्या आहेत, मात्र दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
मुंबई : 'दहावीचा निकाल आज जाहीर होणार' असा मेसेज रोजच सोशल मीडियावर वाचायला मिळत असल्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. आधीच गॅसवर असलेले विद्यार्थी दररोज उठणाऱ्या अफवांमुळे बुचकळ्यात बडलेले आहेत. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाकडून निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाचे वेध लागले आहेत. दहावी एसएससी बोर्डाचा निकाल सात जूनला जाहीर होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वायरल झाल्या आहेत, मात्र दहावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
सोशल मीडियावर जुन्या लिंक पाठवून अफवा पसरवल्या जात आहेत. निकालाच्या तारखेबाबत गेल्या वर्षीच्या 'एबीपी माझा'च्या बातम्यांचे व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवले जात आहेत. मात्र त्यामध्ये तथ्य नसून व्हिडिओची तारीख तपासून मगच त्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन 'माझा'तर्फे करण्यात येत आहे.
Rinku Rajguru | 'इंग्लिशमध्ये सांगू काय' म्हणणाऱ्या 'आर्ची'ला बारावीत किती गुण?
दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा. बोर्डाच्या वेबसाईटवर यासंदर्भात अधिकृत माहिती आणि तारीख उपलब्ध होईल.
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे दहावी परीक्षा घेण्यात आली.
याठिकाणी पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharshtraeducation.com
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव अश्विनी आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये ASH असं लिहावं लागेल.
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र घेऊ शकतात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement