एक्स्प्लोर
दहावीच्या निकालाची तारीख जाहीर!
पुणे: राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (13 जून 2017) जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
सकाळी 11 वाजता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती. अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झालाय.
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement