ओबीसींच्या अमृतसरमधील नवव्या अधिवेशनात 30 मागण्यांचा ठराव एकमताने पारित; नेमक्या मागण्या काय?
अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडतंय. ओबीसी महासंघाचे हे 9वे राष्ट्रीय अधिवेशन असून देशपातळीवरील ओबीसी समाजाचे प्रमुख नेत्यांनी या महाअधिवेशनाला हजेरी लावलीय.
अमृतसर : पंजाबच्या अमृतसरमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय महाअधिवेशन पार पडतंय. ओबीसी महासंघाचे हे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन असून देशपातळीवरील ओबीसी समाजाचे प्रमुख नेते या महाअधिवेशनाला हजेरी लावणार आहे. ओबीसी महासंघाच्या अधिवेशनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, पंजाबसहीत इतर राज्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. या महाअधिवेशनात ओबीसींच्या (OBC Reservation) विवीध मागण्यांचे एकूण 30 ठराव एकमताने पारित करण्यात आले आहेत.
देशात जातनिहाय जनगणना करून आकडेवारी प्रसिद्ध करावी, स्थानिक स्वराज्य संस्थेत 27 टक्के आरक्षण मिळत होते. मात्र आता हे आरक्षण कमी झाले आहे,ते लोकसंख्येच्या आधारावर सरकारने मिळायला पाहिजे. ओबीसींची संख्या 60 टक्के आहे, यासाठी केंद्र सरकारमध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावे, अशा अनेक मागण्या या ठरावाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या महाअधिवेशनात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,आमदार परिणय फुके, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी , महादेव जाणकार इत्यादि अनेक राजकीय नेतेही या अधिवेशनस्थळी दाखल झाले आहेत.
पंजाबमधील ओबीसी समाजाचे प्रश्न अधिवेशनात मांडणार
एकट्या पंजाबमध्ये ओबीसी मध्ये 70 जाती येतात. मात्र त्यांना लोकसंख्येच्या आधारावर त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही, पंजाबमध्ये पण ओबीसी समाजाची जनगणना व्हावी आणि लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व मिळावे. अशी पंजाब मधील ओबीसींची मागणी आहे. पंजाबच्या अमृतसर येथे आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अधिवेशन होत आहे. त्यानिमित्त पंजाबचे ओबीसी नेते पंजाबमधील ओबीसी समाजाचे प्रश्न या अधिवेशनात मांडणार आहे.
ठरवतील नेमक्या मागण्या काय?
- जुनी पेन्शन योजना सुरु करावी
- 50 टक्क्यांची आरक्षण सीमा हटवावे
- नॉन क्रिमिलयेरची मर्यादा 20 लाख करावी
- मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये,सरसकट मराठ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये
- मंडल आयोग लागू करावा
- ज्यूडीशीयरी मध्ये ओबीसी आरक्षण लागू करावे
- महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावे
- महिला आरक्षणात ओबीसी महिलांसाठी वेगळे आरक्षण मिळावे
- एसी एसटी ओबीसी उपवर्ग आरक्षणासाठी सरकारने श्वेत पत्रिका काढावी,लोकसंख्येनुसार आरक्षण असावे
- खासगीकरण मध्ये ओबीसी आरक्षण मिळावे
- ओबीसी शेतकऱ्यांना अनुदान मदत मिळावी
- बजेट मध्ये ओबीसीसाठी वेगळे बजेट असावे
इतर महत्वाच्या बातम्या