एक्स्प्लोर
सोलापूरच्या झेडपी शिक्षकाची कमाल, गुरुजींमुळे 11 देशातील शाळांमधील मुलं साकारत आहेत ग्रीन प्लॅनेट
सहा आठवड्याच्या या प्रोजेक्ट मधील माहितीच्या आधारे गावातील एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार असून तो गावच्या सरपंचांना सादर केला जाणार आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी सुरू केलेल्या ग्रीन प्लॅनेट या शैक्षणिक प्रोजेक्टमध्ये 11 देशांमधील 100 हून शाळांमधील शिक्षक सहभागी झाले आहेत. नियोजनबद्ध वृक्ष लागवडीकरता गावचे एन्व्हायरमेंटल रिपोर्ट कार्ड तयार करणे, गावचा ग्रीन मॅप तयार करणे, गावातील वनखालील क्षेत्र मोजणे, झाडांचे वय काढणे या उपक्रमांचा यात समावेश आहे. 6 आठवड्याचा हा प्रोजेक्ट 15 ऑगस्ट पासून सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी गावचे सर्वेक्षण करून पर्यावरणाची हानी करणारे आणि पर्यावरण पूरक असे घटक आणि त्यांची आकडेवारी गोळा केली आहे, असे डिसले यांनी सांगितले आहे. यामध्ये आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? आपल्या गावात एकूण किती झाडे आहेत? गावात एकूण मोबाईल, टीव्ही, दुचाकी, चारचाकी, एसी, एलपीजी कनेक्शन, चुलीवर स्वयंपाक करणारे कुटुंब संख्या किती? गावचे एकूण क्षेत्रफळ किती? गावात पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत? विहीर, बोअर, नदी, तलाव, कालवा, शेततळे यांची संख्या किती? अशी माहिती मुलांनी गोळा केली आहे. VIDEO | 'प्रयोगशील शिक्षक' रणजितसिंह डिसले यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा आता दुसऱ्या आठवड्यात गावाचा ग्रीन मॅप तयार केला जाणार आहे. त्यातून गावाच्या कोणत्या भागात झाडे आहेत आणि कोणत्या भागात झाडे लावणे गरजेचे आहे, हे लक्षात येईल. तिसऱ्या आठवड्यात गावचे एन्व्हायरमेंटल रिपोर्ट कार्ड तयार केले जाणार असून त्याच्या आधारे गावात होणारे प्रदूषण, प्रदूषण लेव्हल, गावातील वनखालील क्षेत्र आदी मुद्दे मांडले जाणार आहेत. सरसकट वृक्षारोपण न करता सध्या गावचे किती क्षेत्र वनाखाली आहे? नेमकी कोठे वृक्ष लागवड केली पाहिजे? गावात कोणती व किती झाडे लावली पाहिजेत? याचा शोध घेतला जात आहे. सहा आठवड्याच्या या प्रोजेक्ट मधील माहितीच्या आधारे गावातील एकूण क्षेत्रफळाच्या 33% क्षेत्र वृक्ष लागवडीखाली आणण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाणार असून तो गावच्या सरपंचांना सादर केला जाणार आहे. सहभागी देश अझरबैजान बांग्लादेश ब्राझील कमेरून जॉर्जिया ग्रीस भारत इस्त्राईल नायजेरिया युक्रेन अमेरिका व्हिएतनाम एकूण शाळा 104 गावे 104 पैकी महाराष्ट्रातील शाळा 88 गावात सुरू आहे सहभागी जिल्हे परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा,नांदेड, सोलापूर, ठाणे,यवतमाळ,बुलढाणा,रायगड,बीड,नाशिक,पुणे,लातूर,जालना,नागपूर,अमरावती,जळगाव,वर्धा, सोलापूर मधील बेंबळे, करकंब, नागणसुर,शेटफळ,सासुरे, नेवरे या गावात हा उपक्रम सुरू आहे.
आणखी वाचा























