एक्स्प्लोर

सोलापूरची ऐतिहासिक ओळख पुसण्याचा प्रयत्न, सहकारमंत्री वादात सापडण्याची चिन्हं

आता इतिहासाच्या सुवर्ण पानांवर लिखित असलेली ही ओळख पुसण्याचा प्रयत्न देखील सत्ताधाऱ्यांकडून सुरु झाला आहे.

सोलापूर : गिरणगाव, महाराष्ट्रातील मँचेस्टर अशी ओळख असलेलं शहर म्हणजेच सोलापूर. काळानुरुप सोलापुरातील सूतमील बंद पडल्या आणि सोलापूरची ओळख फक्त इतिहासांच्या पानावरच राहिली. आता इतिहासाच्या सुवर्ण पानांवर लिखित असलेली ही ओळख पुसण्याचा प्रयत्न देखील सत्ताधाऱ्यांकडून सुरु झाला आहे. सोलापुरात 1898 साली निर्माण करण्यात आलेली 31 एकर जागेवरील नरसिंग गिरजी मिल विकासाच्या नावावर गिळंकृत करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांमार्फत केला जातो आहे. पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांनी ही 1898 साली ही मिल उभारली नंतर ती नरसिंग गिरजी कापड गिरणी झाली. 1952 नंतर ही गिरणी बंद पडली. तेव्हा ती शासनाच्या अखत्यारित चालविण्यात आली. सोलापूरच्या स्थानिक उद्योजकांने पुढाकार घेऊन उभारलेली पहिलीच कापड गिरणी होती. संपूर्ण देशात बेसॉल्ट दगडावर कामगिरी केलेल्या खूप कमी इमारती आहेत. एन. जी. मिल त्यापैकी एक. मात्र या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याऐवजी विक्रीचा घाट घातल्याने त्याचा विरोध केला जातोय. गेल्याच महिन्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल झाले. या फेरबदलापूर्वी वस्त्रोद्योग खाते सहकारमंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांच्याकडेच होते. त्यांच्याकडून खाते काडून घेतल्याच्या एका आठवड्यातच सोलापूरच्या नगरसिंग गिरजी कापड गिरणीतील सर्व जुन्या वास्तूंचे पाडकाम करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सतत कोणत्या ना कोणत्या वादात नेहमीच सापडत असतात. सोलापूरकरांचा या ऐतिहासिक वास्तूच्या विक्रीला विरोध होत असताना देखील गिरणीच्या जमीनविक्रीत सुभाष देशमुख यांचा कमालीचा रस दिसून येतो आहे आणि त्यामुळेच सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा वादात अडकण्याची चिन्हं आहेत. एनजी मिलच्या जागेतील ऐतिहासिक वास्तूंना धक्का न लावता गारमेंट पार्क उभारण्याचा प्रस्ताव देखील सुभाष देशमुख यांनीच पुढे आणला होता. मात्र आता भूमिका बदलत वारसा वास्तूंचे जतन करण्यापेक्षा भविष्यात आणखी भव्य इमारती उभारता येतील असेही वक्तव्य सहकारमंत्र्यांनी केलं. त्यासाठी अजब दाखला देखील दिला. विकासाला कोणाचीच हरकत नाहीये. अर्थात कोणी विरोध करता कामा नये मात्र विकासाच्या नावाखाली ऐतिहासिक वास्तूंचे पतन होऊन लोकांची घरं भरली जाऊ नयेत इतकीच इच्छा...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget