(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara : जवान चंद्रशेखर भोंडे अनंतात विलीन, भंडाऱ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Bhandara : अपघातात निधन झालेले भंडारा येथील जवान चंद्रशेखर भोंडे अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्यावर भंडाऱ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Bhandara News Update : अपघातामध्ये निधन झालेले 21 महार रेजिमेंटचे जवान चंद्रशेखर उर्फ संदीप भोंडे यांच्यावर भंडारा शहरातील स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आर्मीचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यातील सुपुत्र संदीप उर्फ्र चंद्रशेखर भोंडे हे भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत होते. संदीप हे कर्तव्यावर असताना जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील मच्छीगण वरुन कोरोना विलगीकरण केंद्राकडे जात असताना सरकुली येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. यात संदीप यांच्यासह पाच जवान गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमी जवानांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरू असतानाच संदीप भोंडे यांचे निधन झाले.
संदीप हे 2008 मध्ये 21 महार रजिमेंटमध्ये भरती झाले होते. 2016 ला संदीप यांचे लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षांचा मुगला आहे. ते नुकतेच आपली 75 दिवसांची सुट्टी संपवून 5 मार्च रोजी काश्मीरला रवाना झाले होते. परंतु, अपघातात त्यांचे निधन झाले. निधनानंतर 72 तासांनी संदीप यांचे पार्थिव भंडाऱ्यातील घरी आण्यात आले. आज त्यांच्यावर भंडाऱ्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संदीप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप यांच्या निधनाने भंडाऱ्यावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संदीप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी भंडारा शहरातील म्हडा काँलनी, शास्री चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस, त्रिमूर्ती चौक या मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शरहातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संदीप यांना श्रध्दांजली वाहिली.
महत्वाच्या बातम्या