एक्स्प्लोर

राजकीय अभिनिवेशातूनच कारवाई, दबावात आणण्याचा प्रयत्न; आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रविवारी मुंबई पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी झाली

Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची रविवारी मुंबई पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी झाली. या चौकशीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राजकीय अभिनिवेशातूनच ही कारवाई करण्यात आली आहे. दबावात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

जे आज प्रश्न आज विचारले ते आधीच्या प्रश्नापेक्षा वेगळे होते. ज्यामध्ये मी ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट चा उल्लंघन केले असा आरोप लावण्यात यावा अश्याप्रकारे प्रश्न विचारले गेले. नोटीस देऊन मला दबावात आणण्याचा प्रयत्न केला जातोय. गृहमंत्री काहीही म्हटले तरी माझे प्रोव्हेलेज काय आहेत ते मला माहित आहे. सीबीआय या संदर्भात कारवाई करत आहे, जवाब नोंदविले जात आहेत. माझ्यावरील कारवाई राजकीय अभिनेवेशातूनच केली जात आहे.   वेळेत तुम्ही जर याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसते. आमचे कांड कोणी काढू नये, यासाठी दबाव आणला जातोय. ज्याचा लोकशाही वर विश्वास आहे त्यांना ही नोटीस चुकीची वाटेल.  आम्ही सगळे पुरावे सीबीआयला देऊ त्याचा तपास सीबीआय करेल, असे फडणवीस म्हणाले. संजय राऊत घाबरून पत्रकार परिषद घेतायेत, केंद्रीय तपास  यंत्रणावर आरोप करतात. मला नोटीस आल्यावर मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. संजय राऊतवर जर अशी वेळ आली तर मला का बोलवलं , असा म्हणत का घाबरतात? असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

गोपनीय कायद्याचा भंग केला आहे आणि मीच आरोपी आहे, असे प्रश्न मला विचारण्यात आले असल्याचे दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई पोलिसांनी दोन तास चौकशी केल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत हा दावा केला. यापुढेही राज्य सरकारचे काळे कारनामे बाहेर काढणार असल्याचेही त्यांनी म्हटले. सभागृहात उपस्थित करत असलेल्या प्रश्नामुळे ही चौकशी दबावासाठी करण्यात आली असल्याचाही आरोप त्यांनी केला. 

राज्यातील बदल्यांच्या महाघोटाळ्याची माहिती केंद्रीय गृह सचिवांना दिली. या महाघोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. याआधी महाघोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारने दाबून ठेवला होता. राज्य सरकारने कोणतीच कारवाई केली नव्हती असेही फडणवीस यांनी म्हटले. वेळेत राज्य सरकारने याची चौकशी केली असती तर हे करावं लागलं नसतं असेही फडणवीस यांनी म्हटले. याआधी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी मला पोलिसांनी प्रश्नावली पाठवली होती. मात्र, ती प्रश्नावली आणि आज विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये मोठा फरक होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. या प्रकरणात मला आरोपी अथवा सह आरोपी करता येईल का असा पोलिसांच्या प्रश्नाचा रोख होता. मी गोपनीय कायद्याचा भंग केला असा रोख पोलिसांचा होता. माझ्या आरोपानंतर कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. माझ्यावर व्हिसलबोअर कायदा लागू झाला पाहिजे असे फडणवीस यांनी म्हटले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget