एक्स्प्लोर
Advertisement
मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये स.आयुक्ताचं नाव
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी संजय व्हटकर यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं व्हटकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
सुसाईड नोटमध्ये सोलापूर महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अभिजीत हराळे, सफाई अधीक्षक ए के आराध्ये आणि निवृत्त अधीक्षक राजू सावंत या तिघांच्या नावाचा उल्लेख आहे. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील कचरा संकलनाचा ठेका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे. खरंतर महानगरपालिका कर्मचारी संघटनेने कचरा उचलण्याच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध केला होता. आंदोलनं केली होती. कामगार आणि कर्मचाऱ्यांचा विरोध झुगारुन कचरा संकलन खाजगी कंपनीला देण्यात आलं. त्यातील मनमानी कारभाराला मदत करण्याचा दबाव व्हटकर यांच्यावर होता. याच विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
कचरा संकलन ठेका देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्हटकर यांना होता. यामुळेच कोणत्याही प्रकरणात फाईलवर सही करताना ते सारासार विचार करायचे. त्यांचा हा सरळ स्वभाव वरिष्ठांच्या आड येत होता. सांगेल तिथे सही करावी असा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आग्रह होता. व्हटकर यांच्याकडून कसलीच मदत होत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली.
दरम्यान नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. सोलापूर पोलिस या प्रकरणाची चौकशी करत असून सुसाईड नोट ताब्यात घेण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सोलापूर
सोलापूर
निवडणूक
Advertisement