एक्स्प्लोर

Solapur : फेसबुक ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं; बदनामी केल्याचा आरोप करत गावकरी महिला एसपी कार्यालयात

फेसबुकवरील ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं आहे. वैतागलेल्या या गावातील जवळपास 50-60 नागरिक पोलिसांकडे तक्रार द्यायला पोहोचले. प्रकरण आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील. 

Solapur Malegaon News : सोशल मीडियावरून (Social Media) झालेले वाद, तंटे याच्या बातम्या आपण एरवी ऐकतच असतो. मात्र फेसबुकवरील ग्रुपमुळं अख्खं गाव वैतागलं आहे. वैतागलेल्या या गावातील जवळपास 50-60 नागरिक पोलिसांकडे तक्रार द्यायला पोहोचले. प्रकरण आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील. मळेगाव विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले गाव आहे. राज्यभरात जलयुक्त शिवार अभियानमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याने मळेगावची सर्वत्र ओळख आहे. याशिवाय तंटा मुक्त अभियानामध्ये विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जवळपास 3600 लोकसंख्या असलेल्या या गावात बहुतांश लोक हे उच्चशिक्षित असल्याने केवळ बार्शीतच नाही तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मळेगावची वेगळी ओळख आहे. मात्र याच गावातील महिलांची बदनामी फेसबुकवरील एका ग्रुपच्या माध्यमातून होत आहे.

'मळेगाव पोलखोल' फेसबुकवरील ग्रुप

'मळेगाव पोलखोल' असे या फेसबुकवरील ग्रुपचे नाव असून यामध्ये मळेगाव येथील महिलांविषयक आक्षेपार्ह आणि बदनामी करणारे पोस्ट शेअर केल्या जात आहेत. गावच्या महिला सरपंचांविरोधात देखील आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहे. या विरोधात कारवाईची मागणी करण्यासाठी मळेगावातील सुमारे 50-60 नागरिकांनी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. 

या ग्रुपमुळे गावातील महिलांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. त्यांचे संसार मोडले जात आहे. नांदायला गेलेल्या विवाहित महिलांचे नांदने अवघड झाले आहे. अशा तक्रारीचा पाढा तक्रारदार महिलांनी यावेळी वाचून दाखवला. केवळ महिलांची बदनामीच नव्हे तर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट देखील या ग्रुपवर शेअर केल्या जात आहेत. पोलखोलच्या नावाखाली गावातील प्रतिष्ठीत पुरुष, महिला यांची बदनामी केल्या जाणाऱ्या पास्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे या अकाऊंटची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी अशी मागणी मळेगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

पोलीस अधीक्षकांकडून कारवाईचे आश्वासन

दरम्यान या फेसबुक अकाऊंटची माहिती यापूर्वी पांगरी पोलीस ठाण्याला दिली होती. वारंवार चकरा मारून देखील कारवाई झाली नाही. हे फेसबुक अकाऊंट चालवणारे गावातीलच तरुण आहेत. काही संशयित तरुणांची नावे देखील आम्ही पोलिसांना दिली होती. मात्र पांगरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली आहे. हे सगळं गंभीर असून बदनामीमुळे एखादी व्यक्ती टोकाचे पाऊल देखील उचलू शकते. त्यामुळं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आम्ही केली असून पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिल्याची प्रतिक्रिया मळेगावच्या सरपंच ज्योती माळी यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 09 November 2024Shahu Maharaj on Raju Latkar: सूनेची उमेदवारी मागे का घेतली? राड्यावर शाहू महाराज काय म्हणाले?Sharad pawar On Balasaheb Thorat : धर्माधर्मात, जातीजातीत तेढ निर्माण करु नका : शरद पवारPrithviraj Patil On  Sudhir Gadgiil : जयश्रीताई तुमसे बैर नही, सुधीर गाडगीळ तुम्हारी खैर नही, पृथ्वीराज पाटील यांचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
राजू शेट्टींचा तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय अंगलट; 'स्वाभिमानी'मधील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोडचिट्टी
Vishal Patil : 'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
'सांगली विधानसभेच्या काँग्रेसमधील घडामोडींवरून कोणाला हसू येत असेल, गुदगुल्या होत असतील तर..' खासदार विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Assembly Elections 2024 : जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
जयंत पाटील नाशकात धडकण्याआधीच भाजपला दे धक्का, नोट प्रेस युनियनने घेतला मोठा निर्णय
Prakash Ambedkar on Shiv Sena : मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Pakistan Railway Station Blast : स्फोट, धूर, आक्रोश करणारे लोक, पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, व्हिडीओ समोर 
पाकिस्तानातील क्वेटा रेल्वे स्टेशनवर बॉम्बस्फोट, 24 जणांचा मृत्यू, व्हिडीओ समोर 
Mallikarjun Kharge on PM Modi : महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
महात्मा गांधींना कोणी मारलं? मारणारे पण तुम्हीच, विभागणारे पण तुम्हीच, मोदी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Vaibhav Naik : नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
नारायण राणेंचं वय झालंय, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा; वैभव नाईकांचं थेट आव्हान
Pyre: उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
उत्तराखंडच्या भुताटकी गावात दोन जख्ख म्हाताऱ्यांची गोष्ट, जगभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय 'हा' सिनेमा
Embed widget