CNG Pump : गाडी पुढं गेली अन्... सोलापुरात सीएनजी पंपावर अनर्थ टळला! आपणही काळजी घ्या...
सीएनजी पाईप गाडीला लावलेला असताना देखील गाडी पुढे घेतल्याने मोठा आवाज होऊन पाईप पंपापासून वेगळा झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
Solapur CNG Pump : काल सोलापुरात सीएनजी पंपावर अनर्थ होता होता टळला. सीएनजी पाईप गाडीला लावलेला असताना देखील गाडी पुढे घेतल्याने मोठा आवाज होऊन पाईप पंपापासून वेगळा झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. काल सोलापुरातल्या ग्रामीण पोलिस पंपवर ही घटना घडली. सीएनजी भरल्यानंतर कर्मचारी लगेच पाईप न काढता दुसरीकडे गेला तर गाडी चालकाने देखील पाईप काढला की नाही हे न पाहताच गाडी पुढे घेतली. त्यामुळे पाईप पंपापासून वेगळा झाला.
यावेळी मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र सुदैवाने कोणतीही मोठी हानी या घटनेत झाली नाही. आधीच सोलापुरात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्याने लोक हैराण झालेत. त्यात या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सीएनजी भरताना नागरिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे.
सोलापुरात सीएनजीच्या दरात मोठी वाढ
सोलापुरात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झालीय. सोलापूर सीएनजीचे दर 95 रुपयांवर पोहोचले आहेत. महिन्याभरात जवळपास 12 ते 15 रुपयांनी सीएनजीचे दर वाढल्याने ग्राहकांमधून नाराजीचा सुर उमटतोय. मागील काही दिवसापूर्वी सोलापुरात सीएनजीचा दर 81 रुपये इतका होता. मागील महिन्यात 3 रुपयांची वाढ सीएनजीमध्ये झाली होती. तर या आठवड्यात तब्बल 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोलापुरात सीएनजीचे दर 95 रुपये 59 पैशावर पोहोचले आहेत. सोलापुरात देवदर्शसाठी पुण्यामुंबईहून अनेक नागरिक येत असतात. पुण्यामुंबईच्या तुलनेत हे दर खूप जास्त असल्याची प्रतिक्रिया हे नागरिक देत आहेत. तसेच सोलापुरात व्यावसायिक गाडी चालकांना देखील या वाढीव दरामुळे मोठा फटका बसतोय.
इतर महत्वाच्या बातम्या
Gold Rate Today : सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
LPG Price Hike : महागाईचा भडका, घरगुती गॅस सिलेंडर आता 1000 रुपयांच्या पार