LPG Price Hike : महागाईचा भडका, घरगुती गॅस सिलेंडर आता 1000 रुपयांच्या पार
LPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे.
LPG Cylinder Price : देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. भाज्यापासून तेलापर्यंत सर्वच वस्तूंच्या किंमती दिवसागणिक वाढत आहे. अशात पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder Price) दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. आजपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1020 रुपये असणार आहे. आधी ही किंमत प्रति सिलेंडर 970.50 रुपये इतकी होती. आजपासून एलपीजी सिलेंडरची वाढलेली नवी किंमत संपूर्ण देशभरात लागू करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत असतानाच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ
याआधी 22 मार्च रोजी घरगुती घरगुती सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 949.50 रुपयांवर पोहोचली होती. आता पुन्हा एकदा महागाईने जनतेला मोठा झटका दिला आहे. किंमत वाढल्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत एक हजार रुपयांच्या पार पोहोचली आहे.
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीही अलीकडे वाढल्या
मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली होती. तेल कंपन्यांनी 1 मे रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 102.50 रुपयांनी वाढवून 2355.50 रुपयांवर पोहोचली. यापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2253 रुपये होती. तसेच पाच किलो एलपीजी व्यावसायिक सिलेंडरची किंमत 655 रुपये करण्यात आली आहे. त्या आधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2253 रुपयांवर गेली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :