असद्दुदीन ओवेसी विना नंबरप्लेटच्या गाडीने सोलापुरात, गाडी मालकाला 200 रुपयांचा दंड ठोठावणाऱ्या पोलिसाला पाच हजारांचं बक्षीस
Solapur City Police : पोलीस अधिकाऱ्याला चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर आयुक्तांनी पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे.
Asaduddin Owaisi : एमआयएमचे खासदार असद्दुदीन ओवेसी मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रॅलीला संबोधित करताना शिवसेना,भाजप आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसवरही जहरी टीका केली. मंगळवारी दुपारी असद्दुदीन ओवेसी यांचं सोलापुरात आगमन झालं होतं. मात्र, ते ज्या गाडीमध्ये आले त्या लॅन्डरोव्हर गाडीला समोरील बाजूला नंबरप्लेट नव्हती. परंतु मागील बाजूला नंबरप्लेट लावलेली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावला होता. या पोलीस अधिकाऱ्याला चांगल्या कामगिरीबद्दल सोलापूर आयुक्तांनी पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं आहे.
सोलापूर दौऱ्यावर असणारे असद्दुदीन ओवेसी शासकीय विश्रामधाम येथे लॅन्डरोव्हर या गाडीने आले होते. या गाडीला पुढील बाजूला नंबरप्लेट नव्हती. मात्र गाडी ओवीसी यांच्या नावावर नसून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होती. ज्याच्या नावावर गाडी होती त्या व्यक्तीवरोधात पोलिसांनी कारवाई केली. आणि 200 रुपयांचा दंड वसूल केला. वाहतूक पोलिसांनी त्यांना वाहनाला नंबरप्लेट लावण्याच्या सूचना केल्या. त्यावेळी चालकाने तत्काळ समोरील बाजूस नंबरप्लेट लावून घेतली. ज्या पोलिसांनी ही कारवाई केली त्यांना पोलीस आयुक्तांनी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ओवेसी आलेल्या लॅन्डरोव्हर, वाहन क्रमांक टीएस-११ / ईव्ही-९९२२ या वाहनांवर पुढील बाजूस नंबरप्लेट नसल्याने सदर चारचाकी वाहनावर केंद्रीय मोटार वाहन कायदयानुसार सीएमव्हीआर कलम 50/177 अन्वये कारवाई करण्यात आली. या वाहनचालकाकडून पोलीस अधिकाऱ्यानं 200 रुपयांचा दंड वसूल केला. ही कामगिरी पोलीस निरिक्षक वाबळे यांचे समवेत सपोनि चिंतांकिदी आणि हवालदार सिरसाट यांनी निपक्षपातीपणे केली. त्यांच्या चांगल्या कामगिरी बद्दल सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांनी चिंताकिंदी यांना रोख पाच हजार रुपयांचे बक्षीस मंजूर करुन गौरव केला.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबधित बातम्या :
कुटुंब वाचवण्यासाठीच धर्मनिरपेक्षता गाडून शिवसेनेसोबत सत्ता; ओवेसींची टीका
"कृषी कायद्याप्रमाणे NRC NPR कायदे मागे घ्यावेत NRC NPR लागू होत असेल तर MIM विरोध करेल" : Owaisi
Solapur : शिवसेना सेक्युलर आहे का ते राहुल गांधी आणि शरद पवारांनी सांगावं : Asaduddin Owaisi