एक्स्प्लोर

बार्शीतल्या तरुण प्राध्यापकाची भरारी, तेलंगणाच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बुचाड' सर्वोत्कृष्ट

प्रा.विशाल गरड लिखित आणि दिग्दर्शित बुचाड या लघुचित्रपटास तेलंगणा राज्यातील महत्वाचा पुरस्कार पटकावला आहे. झहिराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या नॅशनल कम्युनिटी मेडिया फिल्म फेस्टिव्हल या राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या बार्शीतल्या एका तरुण प्राध्यापकानं बनवलेल्या लघुचित्रपटाला तेलंगणामधील एका राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तयार केलेल्या 'बुचाड' या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशाल गरड असं या तरुण प्राध्यापकाचं नावं आहे. विशाल गरड लिखित आणि दिग्दर्शित बुचाड या लघुचित्रपटाला हा बहुमान मिळाल्यानं सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. विशेष म्हणजे विशाल गरड यांनी सदर पुरस्कार शेतकरी वेशात स्वीकारून तो अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केला आहे.

नॅशनल कम्युनिटी मीडिया फिल्म फेस्टिव्हल या राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार युनेस्कोचे प्रा.प्रविण पवराला यांच्या हस्ते विशाल गरड यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डी.डी.एसचे डायरेक्टर पी.व्ही.सतीश, प्रसिध्द तेलगु दिग्दर्शक नाग अश्विन, राजेंद्र पाटील, चिन्ना परसम्मा, हैदराबाद विद्यापीठातील प्रा.कांचन मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.

बार्शीतल्या तरुण प्राध्यापकाची भरारी, तेलंगणाच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बुचाड' सर्वोत्कृष्ट

'बुचाड'चे छायाचित्रण सचिन नलावडे यांनी केले आहे तर संकलन अमोल लोहार यांनी केले आहे. या लघुचित्रपटात विशाल गरड, वैष्णवी जानराव, वैष्णवी काळे, कादंबरी गरड यांच्या मुख्य भूमिका आहेत.

बार्शीतल्या तरुण प्राध्यापकाची भरारी, तेलंगणाच्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'बुचाड' सर्वोत्कृष्ट

विशाल गरड यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं की, दुःखाचे अनेक प्रकार असतात पण गेल्या शेकडो वर्षात न पाहिलेले आणि अनुभवलेले दुःख 'बुचाड' या लघुचित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांची अव्यक्त भावना व्यक्त करण्याचा हा एक गडद प्रयत्न केला आहे.  जंगलतोड, प्रदूषण, शहरीकरण, नद्यांचे विस्तारीकरण, औद्योगिकीकरण, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल या कारणांमुळे निसर्ग व्यवस्था बदलत चालली आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या भीमा नावाच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याची गोष्ट बुचाड' या लघुचित्रपटात चित्रित करण्यात आली आहे. या नविन क्षेत्रात टाकलेल्या पहिल्याच पाऊलाचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने सन्मान झालाय, असं विशाल गरड यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremony : शपथविधीला उरले 48 तास; सागर-वर्षा बंगल्यावर खलबतंDevendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावरABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
मुंबई सर्वांचीच, पण सर्वात आधी मराठी माणसाची, भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी : मंगलप्रभात लोढा
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
सत्ता स्थापनेपूर्वी मोठ्या घडामोडी, तब्बल 6 दिवसानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीला, वर्षा निवासस्थानी खलबतं
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Embed widget