एक्स्प्लोर

राजकोटच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसह रचनेबाबत काय काळजी घेण्यात आली? शिल्पकार अनिल सुतार म्हणाले...

SIndhudurg: नव्या पुतळ्याचे शिल्पकार अनिल सुतार यांनी पुतळ्याची मजबुती, रचना आणि टिकाऊपणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Sindhudurg: काही महिन्यांपूर्वी राजकोटमध्ये कोसळलेल्या राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता नव्याने पुन्हा एकदा दिमाखात उभा राहिला आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने देशभरात महाराष्ट्राची नाचक्की झाली. मात्र आता मागच्या चूका जाणून घेत या नव्या पुतळ्याचे शिल्पकार अनिल सुतार यांनी पुतळ्याची मजबुती, रचना आणि टिकाऊपणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

छत्रपती शिवरायांचा हा 40 फुटांचा भव्य पुतळा 26 ऑगस्ट 2024 ला दुपारी 1 च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. पंतप्रधान नरेंद्र मोंदींना पुतळा पडल्याबद्दल माफी मागावी लागली. त्यानंतर  वर्षभराच्या आत 83 फुटांचा छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यात आला. योग्य देखभाल न केल्याने गंज आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे पडलेल्या या पुतळ्यानंतर राजकीय वतावरणही तापले होते. जगविख्यात शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी छत्रपती शिवरायांचा तब्बल 83 फूट उंचीचा पुतळ्याची उभारणी केलीय. या पुतळ्याच्या सुरक्षेबाबत आणि रचनेबाबत काय काळजी घेण्यात आलीय?

नव्या पुतळ्याबाबत पुतळ्याचे शिल्पकार काय म्हणाले?

आयआयटीचे अभियंते आणि जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे शिल्पकारही या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होते. या पुतळ्याची रचना इतकी भक्कम आहे की, वादळं, पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्तींचाही विचार करून तो तयार करण्यात आला आहे. जमिनीपासून 93 फूट उंचीचा हा पुतळा असून त्यावर 10 फूट उंचीचा चबुतरा आहे. त्यामुळे हा पुतळा एकूण 103 फूट उंचीचा आहे, जो देशातील सर्वात उंच शिवपुतळा ठरतो. 

अनिल सुतार म्हणाले, "मागील वेळचा पुतळा का कोसळला, याचा अभ्यास केला. त्यामध्ये केवळ लोखंडाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे काही महिन्यांतच त्याला गंज लागून कमकुवत झाला आणि वादळात कोसळला. त्यांनी पुढे सांगितले की, "या वेळेस आम्ही अशा चुकांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. नवीन पुतळा उभारताना आम्ही ब्राँझ आणि झिंक यांसारख्या धातूंचा वापर केला आहे. हेच धातू आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्येही वापरत आहोत."नवीन पुतळ्याची रचना अशी करण्यात आली आहे की, तो चक्रीवादळासारख्या तीव्र हवामानातही ताठ उभा राहील. त्याची उंची देखील लक्षणीय आहे. सुतार यांनी सांगितले, "महाराजांच्या मूळ पुतळ्याची उंची 60 फूट असून तलवारीपर्यंत त्याची एकूण उंची 93 फूट आहे. त्यासोबत 10 फूट उंचीचा चबुतरा देखील आहे." डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याबद्दल बोलताना अनिल सुतार म्हणाले, "हा एक भव्य प्रकल्प आहे. त्यासाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे." नवा पुतळा अधिक मजबूत, हवामान बदलांना तोंड देणारा, आणि दीर्घकाळ टिकणारा असा उभा राहिल्याने प्रशासन आणि जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आता या भव्य पुतळ्याच्या माध्यमातून शिवरायांची शौर्यगाथा आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

पुन्हा त्याच स्वाभिमानाने दिमाखात उभा; ना जागचा हलणार ना वीज स्पर्श करू शकणार, कसा आहे राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा नवा पुतळा?

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Embed widget