एक्स्प्लोर

Sindhudurg : तळकोकणात मुसळधार पाऊस, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट' जारी

Sindhudurg : सिंधुदुर्गामध्ये गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून पुढची चार दिवस हा पाऊस कायम राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : तळकोकणात गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून 18 जुलैपर्यंत सिंधुदुर्गात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आणखी चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेले तीन दिवस मुसळधार बरसणाऱ्या पावसाने मालवण तालुक्यातील मसुरे पंचक्रोशीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. रमाई नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत येथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा येथील बाजारपेठे नजीक पोचले होते. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट येथे तर पोईप धरणावर पाणी असल्याने हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे. गड नदीला सुद्धा पूर आल्याने भगवंतगड कॉजवे पाण्याखाली गेला होता. तसेच पालयेवाडी येथे रस्त्यावर पाणी आल्याने बांदिवडेत पोहोचणारे रस्ते बंद झाले आहेत. नदीचे पाणी शेतीतून प्रवाहीत होऊन वाहत असल्याने भात शेती लावणी  वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाचा जोर रात्री पर्यंत कायम राहिल्यास मसुरेसह वेरळ, बागायत आदी भागातील शेतीचे नुकसान होणार आहे.

कुडाळ तालुक्यातील कर्ली नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काल रात्री प्रशासनाने आंबेडकरनगर येथील पुरामुळे बाधित झालेल्या 6 कुटुंबातील 25 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित केलं. कुडाळ पावशी येथील भंगसाळ पुलाजवळ रात्री साडे आठ वाजता मोजलेल्या पाणी पातळीनुसार कर्ली नदीची पातळी 9 मीटर इतकी होती. आता मात्र पाणी ओसरत आहे.

जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील भेडशी काजवेवर गाडीसह अडकलेल्या आंध्र प्रदेशातील पाच युवकांची भेडशीतील युवकांनी सुखरुप सुटका केली. गोवा येथुन आंध्रप्रदेश येथे परत असताना भेडशी काँजवेवर असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने गाडीसह ते पाचजण अडकले होते. त्यातील प्रथम तिघेजण बाहेर पडले. तर अन्य दोघे गाडीत अडकून पडले होते. ही घटना समजताच भेडशीतील युवक घटनास्थळी दाखल झाले. पर्यायी मार्गाच्या बाजूने जात त्या काजवे जवळच्या रस्त्यावर असलेल्या  कंबरभर पाण्यात उतरुन जात गाडीजवळ पोचले. गाडीतून दोघांना सुखरूप बाहेर काढले. काही काळाने पाणी कमी झाल्यावर ते वाहन सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले. या मदत कार्यात गुरुनाथ डांगी, महेंद्र बोंन्द्रे, गणपत काणेकर, ऋषिकेश सोलापुरकर, रामचंद्र सोलापुरकर सिद्धेश डांगी ,रेहान लतिफ, नरेश मेस्त्री, पत्रकार गोविंद शिरसाट, उपसरपंच गणपत डांगी, दोडामार्ग पोलीस ठाणे निरीक्षक आर.जी.नदाफ, सहकारी पोलीस नाईक, दीपक सुतार उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amravati Chivda | अमरावतीच्या तळेगाव जत्रेत कच्चा चिवड्याला प्रसिद्धी, चव चाखण्यासाठी ग्राहकांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget