सिंधुदुर्गातील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काजू संशोधनात देशात अव्वल; तिसऱ्यांदा बहुमान
Sindhudurg News : सिंधुदुर्गातील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र काजू संशोधनात देशात अव्वल ठरली आहे. उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून तिसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे.

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक विस्तार कार्य केल्याने या काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पाची वार्षिक सभा ऑनलाईन घेण्यात आली. या सभेमध्ये देशातील विविध काजू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ संशोधनाचे निष्कर्ष प्रस्तुत करतात. ज्या काजू संशोधन केंद्राने उत्कृष्ट संशोधनात्मक विस्तार कार्य आणि इतर तत्सम असे काम केले आहे, अशा काजू संशोधन केंद्रास उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून गौरविण्यात येते.
यावर्षीची अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्पाची सभा नुकतीच दिल्ली येथे पार पडली. या सभेमध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले अंतर्गत अखिल भारतीय समन्वित काजू संशोधन प्रकल्प वेंगुर्ले या प्रकल्पास देशातील उत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून त्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र अंतर्गत काजू संशोधन केंद्रास हा बहुमान तिसऱ्यांदा मिळालेला आहे. यापूर्वी हा बहुमान त्यांना 2016, 2017 आणि 2021 मध्ये मिळालेला आहे.
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले अंतर्गत काजू संशोधन केंद्राने शेतकऱ्यांच्या दृष्टीने नेहमीच संशोधनात्मक भरीव कार्य अविरतपणे करत आहे. याचा एक भाग म्हणून नुकतेच वेंगुर्ले येथील काजूच्या सुधारित जाती आणि आफ्रिकन देशातील काजू यांचे 'फायटोकेमिकल्स' पृथ्थकरण करण्यात आले. या पृथ्थकरणातील घटकावरून या संशोधन केंद्रावरील काजू जातीची प्रतवारी तसेच गुणवत्ताही आफ्रिकन देशातील काजू पेक्षा उत्कृष्ट असल्याचं आढळून आलं आहे. याचा फायदासुद्धा काजू बागायतदारांना तसेच प्रक्रिया उद्योगांना होणार आहे. या संशोधन केंद्रावर नियमित काजू कलमांना देशभरात मोठी मागणी असते.
काजूगराच्या भाजीसाठी या संशोधन केंद्रात तेलविरहीत आणि सहजपणे सोलता येणारी काजूच्या जातीवरील संशोधनसुद्धा सुरु आहे. त्याचप्रमाणे काजू उच्च घन लागवड तसेच इतर विविध संशोधनाचे काम सुरु आहे. अशा या जगप्रसिद्ध संशोधन केंद्रास देशभरातील सर्वोत्कृष्ट काजू संशोधन केंद्र म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.
भारतीय काजू आणि आफ्रिकन काजू ओळखायचा कसा?
भारतीय काजू आणि आफ्रिकन काजू ओळखण्यासाठी आपण जर बघितलं तर सहजासहजी आपल्या नजरेला ओळखता येत नाही. यातील फरक सहजासहजी लक्षात येत नाही. परंतु जर तुम्ही भारतीय काजूची चव घेतली तर आपला काजू हा खुशीत असतो. अतिशय चवदार असतो आणि सर्व बाबतीत तो श्रेष्ठ असतो. मात्र याबाबत संशोधन करण्यासाठी आम्ही आफ्रिकन काजूचं आणि आपल्या भारतीय काजूचं फायटोकेमिकल्स तपासून पाहिलं. या दोघांमध्ये भारतीय काजू मध्ये मुबलक प्रमाणात फायटोकेमिकल्स आढळून आले आहेत. फायटोकेमिकल्स मुळे भारतीय काजू मधील चव, स्वाद आणि खुसखुशीतपणा असतो. त्यामुळे भारतीय काजू आफ्रिकन काजू पेक्षा श्रेष्ठ आहे.
ओला काजूगर किंवा भाजीसाठी वापरण्यात येणारा ओला काजूगरा संदर्भात नवीन संशोधन काय सुरू आहे. बाजारपेठेत ओला काजूगराला मोठ्या प्रमाणात मागणी असते. हॉटेल किंवा घरात ओल्या काजुगराची भाजी केली जाते. मात्र त्यात तेलकटपणा खूप असतो. तसेच ओला काजुगर काढण्यासाठी त्यावरील टरफल कडक असतं. त्यामुळे डिंक उडण्याचीशक्यता असते. मात्र नवीन काजु विकसित करत आहोत, त्यात काजुगरावरील टरफल अतिशय मऊ असत. त्यामुळे त्यावरील टरफल काढणं सुलभ होणार आहे. तसेच ते तेलविहरित कसं असेल याबाबत संशोधन सुरू आहे. हे संशोधन विकसित झाल्यानंतर मग त्याचा प्रसार केला जाणार आहे. सध्या याबाबत संशोधन सुरू आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
