एक्स्प्लोर

तळकोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाला डिजीसीएचा परवाना मिळाला

सिंधुदुर्ग विमानतळाचा खर्च जवळपास 800 कोटी रुपये असून कन्सेशन कालावधी 90 वर्षापेक्षा जास्त आहे. दक्षिण कोकण क्षेत्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या सिंधुदुर्ग विमानतळाला आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडच्या एसपीव्हीला डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडून (डीजीसीए) चिपी विमानतळासाठी चालन परवाना प्राप्त झाला आहे. या एरोड्रोम लायसेन्समुळे आता चिपी विमानतळ एयरलाईन्स आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुला करणे कंपनीला शक्य होईल. आयआरबी इन्फ्रा च्या एसपीव्ही कंपनीने विकसित केलेला हा पहिला ग्रीनफील्ड एयरपोर्ट प्रकल्प आहे. कोकण संपूर्ण देशासोबत जोडले जाण्यासाठी चिपी विमानतळ खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हा प्रकल्प कोकणात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी आणि स्थानिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
 
कंपनीला जारी केलेल्या परवान्यामध्ये डीजीसीएने या परवान्यामार्फत विमानतळ हे विमानामार्फत सर्व व्यक्तींना समान अटी व शर्तीसह उतरण्यासाठी आणि येथून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी नियमित जागा म्हणून वापरण्यासाठी अधिकृत करत आहे. ज्यामध्ये धावपट्टी आणि संबंधित सुविधांच्या तपशिलांची आवश्यकता असते. विमानतळ मॅन्युअलमध्ये सूचित करण्यात आलेल्या मंजुरी देण्यात आलेल्या सर्व सवलतीप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी सवलतींचा समावेश आहे.

तळकोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाला डिजीसीएचा परवाना मिळाला

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र डी. म्हैसकर यांनी विमानतळाचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर संचालनाचा परवाना मिळवून यंदाच्या वर्षी अजून एक मोठा टप्पा पार केल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. 90 वर्षापेक्षा जास्त कन्सेशन कालावधी आणि क्षेत्रीय क्षमता यामुळे हा प्रकल्प प्रगतीच्या अनेक वाटा खुल्या करेल. या नव्या सुविधेच्या उभारणीत मौल्यवान सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही संबंधित सर्व प्राधिकारणांचे आणि हितधारकांचे आभार मानतो. एयरलाईन कंपन्या आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा विमानतळ लवकरच खुला होईल.

सिंधुदुर्ग विमानतळाचा खर्च जवळपास 800 कोटी रुपये असून कन्सेशन कालावधी 90 वर्षापेक्षा जास्त आहे. दक्षिण कोकण क्षेत्रातील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, दक्षिणेकडील राज्ये, मुंबई व त्यानंतर देशातील अनेक वेगवेगळे भाग हवाईमार्गे जोडले जावेत हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या विमानतळावरून प्रवासी वाहतूक तर होईलच. शिवाय कार्गो वाहतुकीला वेग प्राप्त होईल. ज्यामुळे कोकणच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, स्थानिक लोकांसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या व इतर उद्योगव्यवसायांच्या मुबलक संधी उपलब्ध होतील. देशाच्या पश्चिम विभागाचे कार्गो केंद्र बनण्याची क्षमता या विमानतळामध्ये आहे. कारण त्याठिकाणी भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध आहे. तसेच भविष्यातील वाढत्या गरजानुसार त्याची व्याप्ती वाढवता येणे शक्य आहे.

येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरू होत आहे. मात्र यावरून सेना-भाजपमध्ये श्रेय वादाचा मुद्दा समोर येतोय. दोन्ही पक्षांकडून चिपी विमानतळ कोणी बांधून पूर्ण केलं यावरून असे वाद सुरु आहे. चिपी विमानतळ रस्ते वीज पाणी हे प्रमुख आणि मूलभूत गरजा त्यातील वीज आणि पाणी यांची समस्या सुटली असली तरीदेखील मुंबई-गोवा महामार्ग ते चिपी विमानतळ असा रस्ता अद्यापही खड्डेमय आहे. याबाबत नारायण राणे यांनी हा रस्ता योग्य होईल अशी माहिती दिली आहे. तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पावसाळा संपल्यानंतर लगेच हा रस्ता पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget