एक्स्प्लोर

भाऊबीजेच्या आदल्या दिवशी बहीण-भावाचा अपघातात मृत्यू, वसमतमधील दुर्दैवी घटना

दिवाळीच्या काळात मामाच्या गावी जाणाऱ्या भावा बहिणीचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हिंगोली जिल्ह्यात दुःख व्यक्त केले जात आहे.

हिंगोली :   दिवाळीच्या काळात मामाच्या गावी जाणाऱ्या भावा बहिणीचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हिंगोली जिल्ह्यात दुःख व्यक्त केले जात आहे.  विरेगाव येथील रहिवासी असलेल्या अरविंद सूर्य यांची दोन मुले कीर्ती सूर्य आणि आदर्श सूर्य मामा राजू खिलारे यांच्यासोबत गावी जात होती. 

मामाच्या गावी जात असताना वसमत ते निळा या मार्गावरील रोडवर टाकळगाव जवळ अचानक समोरून टाटा मॅजिक पिकप क्रमांक MH 22 AA 1620 ला जोरदार धडक दिली आणि या धडकेत आदर्श सूर्य (9)आणि कीर्ती सूर्य (8) या दोघांचा या धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला आहे. तर मामा राजू खिलारे (24) यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना 4 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तत्काळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टाटा मॅजिक पिकप चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तर मामा राजू खिलारे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  उद्याच भाऊबीज असताना आज या दोन भावंडांचा अपघातात मृत्यू झाल्याने प्रचंड दुःख व्यक्त केले जात आहे.  मामा राजू खिलारे हा त्याच्या भाचा आणि भाचीला त्याच्या गावी म्हणजेच महिपाल पिंपरी या गावी घेऊन जाण्यासाठी आला होता. परंतु वाटेतच काळाने घाला घातला. 

या घटनेची माहिती मिळताच राजू खिलारे यांचे गाव महिपाल पिंपरी आणि कीर्ती व आदर्श यांचे गाव विरेगाव या गावामध्ये शोककळा पसरली आहे.  आता या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget