एक्स्प्लोर
मतदानाचा सेल्फी दाखवा, मालमत्ता करात 25 टक्के सूट मिळवा!
पनवेल: पनवेल महापालिकेसाठी ही पहिलीच निवडणूक असल्यानं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयुक्त राजेंद्र निंबाळकरांकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक अनोखी शक्कलही त्यांनी लढवली आहे.
मतदानाचा सेल्फी दाखवल्यास मालमत्ता करात 25 टक्के सूट दिली जाणार आहे, तर मतदानाचा पुरावा दाखवल्यास तीन दिवस जेवणाच्या बिलावर 25 टक्के सूट मिळणार आहे. शहरातील सर्व चौक, रस्त्यांवर वासुदेव, पथनाट्य आयोजित करून जनजागृती केली जात आहे.
मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडावं यासाठी अनेक चित्ररथही काढण्यात येत आहेत. या माध्यमातून देखील मतदारांना जागरुक करण्यात येत आहे. त्यामुळे आता पनवेलकर नेमकं किती मतदान करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement