एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजपमध्ये राक्षसराज, मुख्यमंत्री-पंकजा वादावर शिवसेनेचा टोला
मुंबई : जलसंधारण खात्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामधील वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. भाजप नेत्यांमधील अंतर्गत धुसफुशीला राक्षसाची उपमा देत शिवसेनेने मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे.
काश्मीरचं खोरं पेटलेलं असतानाही भाजपचा एक आमदार चकार शब्द काढत नाही. मात्र महाराष्ट्रात वेगळंच सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणा, कुजबुज मोहिमा चालल्या आहेत. पुतळे जाळून निषेध केला जात आहे. पण हे भाजपाअंतर्गत धुमशान आहे. मुख्यमंत्री फक्त भाजपाचे नसून महाराष्ट्राचे आहेत याचे भान ठेवायला हवे. आपणच आपल्या मुख्यमंत्र्यांची बेइज्जत केली तर या अनागोंदीस राक्षसराज म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांना आता अधिक सावधान राहावे लागेल, असं 'सामना'त म्हटलं आहे.
'सामना'त पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर टीकेचे बाण
गोपीनाथ मुंडे यांचाच स्वाभिमानी बाणा दाखवत पंकजाताईंनी सौम्य राडा केला असला तरी मंत्रिमंडळात फेरबदल करणे हा मुख्यमंत्र्यांचाच अधिकार असतो. पंकजाताई अधूनमधून ‘मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल,’ अशी इच्छा व्यक्त करीत असतात, पण मुख्यमंत्री कोणी व्हायचे हा निर्णय आताही दिल्लीतूनच घेतला जातो. त्यामुळे पंकजाताईंनी राजकीय चिंतन करून नवे आडाखे बांधायला हवेत. खडसे यांनाही मुख्यमंत्री व्हायचेच होते व त्यासाठीच त्यांनी शिवसेना-भाजप युती तोडायला लावली. (अशी फुशारकी ते मारतात!) पण आज खडसे घरी आहेत व देवेंद्रभाऊ मुख्यमंत्री आहेत.
संबंधित बातम्या : राक्षसरुपी शिवसेनेला बाटलीत बंद करा : आशिष शेलार
दोन महत्त्वाची खाती काढून घेतली मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेकडील जलसंधारण आणि रोजगार हमी योजना ही दोन महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली. सध्या त्यांच्याकडे ग्रामविकास आणि महिला बालकल्याण या खात्यांची जबाबदारी आहे. कॅबिनेटपदी प्रमोशन झालेल्या राम शिंदे यांच्याकडे जलसंधारण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे रोजगार हमी योजनेची जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजांचं ट्वीट आणि मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय तत्पूर्वी सिंगापूरला वर्ल्ड वॉटर लीडर समिटसाठी पोहोचलेल्या पंकजा मुंडेंनी आता मी जलसंधारण खात्याची मंत्री नसल्याने या परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं ट्वीट केलं होतं. त्यावर खात्याची मंत्री म्हणून नव्हे तर सरकारची प्रतिनिधी म्हणून या परिषदेला हजर राहा, असं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजांना आदेश दिला होता. संबंधित बातम्यामुख्यमंत्र्यांसोबतच्या वादानंतर पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
पंकजा मुंडे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन
जलसंधारण खातं काढल्यानं पंकजांची ट्विटरवरुन नाराजी, मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय…
मुख्यमंत्र्यांकडून खाते वाटप जाहीर, पंकजा मुंडे आणि तावडेंना धक्का
खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement