एक्स्प्लोर

भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, सामनाच्या अग्रलेखातून टीकास्त्र

2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता," असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता यावर प्रत्युत्तर सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलं आहे.

मुंबई : भाजपच्या चेहऱ्यावरील मुखवटे संपता संपत नाहीत. त्यामुळेच 2015 जागा असूनही भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे, असा घणाघात आजच्या सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. शिवाय, शिवसेनेच्या खऱ्या चेहऱ्याबाबत बोलणाऱ्या भाजपनं आधी स्वत:चा चेहरा आरशात पाहावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. तर, 2014 साली शिवसेनेचा सत्तेचा प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं गांभीर्यानं मत व्यक्त केलं नाही. तर, तेव्हाची परिस्थिती सांगत चव्हाणांच्या दाव्यात तथ्य नसल्याचंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. पण विरोधी पक्षानं मात्र ते फारच गांभीर्यानं घेतलं, आणि त्यात स्वत:चा चेहराच ओरबाडल्याचंही म्हटलं आहे.

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?

"2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, मात्र तेव्हा काँग्रसने प्रस्ताव फेटाळला होता," असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केला होता. तसंच राज्यातलं सध्याचं सरकार कार्यकाळ पूर्ण करणार का, याबाबत पूर्ण हमी कोणीच देऊ शकणार नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर तसंच इंदिरा गांधी-करीम लाला यांच्या भेटीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरू असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचा हा गौप्यस्फोट खबळब माजवणारा होता. तसेच, यावरून विरोधी बाकावर बसलेल्या भाजपनेही शिवसेनेवर टिका केली होती.

पाहा व्हिडीओ : 2014 मध्ये शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव : पृथ्वीराज चव्हाण 

सामनाचा अग्रलेख :

2014 सालचीच शिवसेना आजही आहे. भाजपला '105' असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे 2019 सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. 2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपट्याचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास श्री. फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

शिवसेनेचा खरा चेहरा कोणता यावर महाराष्ट्र भाजपने संशोधन सुरू केले आहे. संशोधन म्हणण्यापेक्षा पुरातत्व विभागाचे उत्खनन म्हणणे सोयीचे ठरेल. 2014 मध्ये शिवसेनेने काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिल्याचा 'स्फोट' काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याआधारे हे उत्खनन सुरू झाले आहे. श्री. चव्हाण यांचे म्हणणे असे की, 2014 साली विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी आघाडी स्थापन करण्याचा शिवसेनेचा विचार होता. त्यादृष्टीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याशी संपर्क साधला होता. आपण तो प्रस्ताव फेटाळला. चव्हाण यांच्या या दाव्याने फारशी खळखळ किंवा खळबळ होण्याचे कारण नव्हते. चव्हाणांचा दावा मुंबईतील सौम्य थंड हवेत वाहून गेला. शिवसेनेने किंवा राष्ट्रवादीने यावर गांभीर्याने मत व्यक्त केल्याचे दिसत नाही; पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा दावा इतका गांभीर्याने घेतला की, दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत विझलेली चिलीम फुंकण्याचा ते प्रयत्न करीत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर उभे राहून त्यांनी सांगितले, "हे अत्यंत आश्चर्यकारक आहे व पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असून त्यामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला आहे!" श्री. चव्हाण काय बोलले त्यात आम्हाला पडायचे नाही; पण यानिमित्ताने भाजप आपला चेहरा स्वतःच ओरबाडीत आहे. खरेतर 2014 साली भाजपचाच खरा चेहरा उघड झाला व तो संपूर्ण देशाने पाहिला. पृथ्वीराज चव्हाण जे सांगतात त्यात

पाहा व्हिडीओ : पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ

'लॉजिक' नावाचा प्रकार

अजिबात नाही हे आधी मान्य केले पाहिजे. 2014 साली हिंदुत्व, हिंदू मतांचे विभाजन आणि 25 वर्षांचे नाते यांचा विचार न करता अत्यंत निर्घृण पद्धतीने भाजपने शिवसेनेशी युती तोडली. त्यांचे हिंदुत्व वगैरे ढोंग ठरले. हा भाजपचा पहिला मुखवटा उतरला, पण त्यानंतरही खरा चेहरा बाहेर आला नाही. कारण एका मुखवट्यावर त्यांचे भागत नाही. 2014 सालात भाजप-शिवसेना वेगळे लढले तसे काँग्रेस-राष्ट्रवादी वेगळे लढले. चौरंगी लढतीत भाजप 122 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. शिवसेनेने स्वबळावर 63 जागा घेतल्या. काँग्रेस 42 तर राष्ट्रवादी 41 जागांवर थांबले. म्हणजे विधानसभा त्रिशंकूच ठरली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा दारुण पराभव झाला व सत्ताधारी काँग्रेस थेट तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. त्यामुळे काँग्रेसला त्यावेळी 'आवाज' नव्हता. चव्हाण यांच्याकडे सरकार स्थापनेचा प्रस्ताव घेऊन जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. शिवसेना विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होती व भाजप पुन्हा हिंदुत्व वगैरे नात्यांची जाळी फेकू लागला होता. सरकार स्थापनेचे घोंगडे लटकलेच होते. त्यावेळी ध्यानीमनी नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल पुढे आले व त्यांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. येथे भाजपचा दुसरा मुखवटा गळून पडला. म्हणजे हे सर्व आधीच ठरले होते असे म्हणायला हरकत नाही. 2014 साली हे नाटय़ घडत असताना शिवसेनेने चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्याने वावरत होती.

मुखवट्याचे कारखाने

भाजपकडेच होते. 'लॉजिक' म्हणाल तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने आजच्याप्रमाणे एकत्र यावे असे जबरदस्तीने ठरवले असते तरी 'आकडा' जमत नव्हता. मारून मुटकून 149 चा आकडा होता व तो धोकादायक होता. ते काठावरचे बहुमत होते व घोडेबाजारात मशहूर असलेले भाजपवाले साम-दाम-दंड-भेद नीतीचा वापर करून तोडफोड करायला तयार होते. श्री. फडणवीस यांनी आणखी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. 2014 साली राष्ट्रवादीने भाजपला उघड पाठिंबा दिला व त्यामागे गुरूमहाराजांची इच्छा व दिशा होती. हे सत्य स्वीकारले तर शिवसेनेच्या चेहऱ्यावर ओरखडे मारण्यापेक्षा भाजपने स्वतःचा खरा चेहरा आरशात पाहणे गरजेचे आहे. 2014 सालचीच शिवसेना आजही आहे. भाजपला '105' असूनही विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली. कारण भाजपच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत. बोलायचे एक व करायचे दुसरेच. हे 2019 सालीही झाले. त्याचे दृश्य फळ म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला व गुरूमहाराजांनी प्रयत्न केले तरी शरद पवारांनी भाजपची कुरघोडी यावेळी होऊ दिली नाही. अर्थात सोनिया गांधी यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला नाही. 2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपटय़ाचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास श्री. फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही.

संबंधित बातम्या : 

शिवसेनेकडून 2014 मध्येही काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई महापालिकेत आता भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत आवाज उठवणार

तान्हाजीच्या दृश्यांवर मॉर्फिंग, शिवराय मोदी तर तान्हाजी अमित शहा; दिल्ली निवडणुकीपूर्वी व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget