एक्स्प्लोर

शिंदे गटात आमदार का चाललेत? हे लवकरच समजेल; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crises : शिंदे गटात आमदार का चाललेत? हे लवकरच समजेल, संजय राऊतांच्या वक्तव्याची चर्चा.

Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crises : जे आमदार सोडून गेले ती खरी शिवसेना नाही, तर काल वर्षा निवासस्थान सोडून मुख्यमंत्री मातोश्रीवर जात असताना जे रस्त्यावर जे कार्यकर्ते होते, तो खरा शिवसेना पक्ष, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. जे आमदार गुवाहाटीला (Guwahati) गेले आहेत, त्यातले 18 ते 20 आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचा दावाही यावेळी राऊतांनी केला. आज दोन आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. ते तुम्हाला सगळी कहाणी सांगतील असंही राऊतांनी सांगितलं आहे. 

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "ईडीच्या किंवा इतर काही अमिषांना बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः ते स्वतःला बछडे आणि वाघ वैगरे म्हणून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उभा आहे. 4 आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत. हे का गेलेत सोडून, याची कारण लवकरच समोर येतील." 

"सोडून गेलेल्या काही आमदारांशी आमच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्यातील काहीजण अद्यापही आमच्या संपर्कात आहेत. ते सांगतात, आम्हाला कसं जबरदस्तीनं नेलंय तिकडे. आज आमच्या दोन आमदारांची पत्रकार परिषद आहे. नितीन देशमुख आणि कैसाल पाटील तुम्हाला सगळी कथा सांगतील. अशाप्रकारे किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत." असं संजय राऊत म्हणाले. मी भारतीय जनता पक्ष हाच शब्द वापरतोय. कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असा घणाघाती आरोपही संजय राऊतांनी भाजपवर केला आहे. 

आज मुख्यमंत्री कोणतीही बैठक घेणार नसून वर्षावर काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर आमचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख पत्रकार परिषद घेतील. यावेळी पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित असतील. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कोणतंही आवाहन केलेलं नाही. या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं एवढंच सांगायचं आहे.", अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

"आजही आमचा पक्ष मजबूत आहे. उद्धव ठाकरे वर्षावरुन मातोश्रीला जात असताना रस्त्यावर जे चित्र होतं ती शिवसेना आहे.", असं राऊतांनी सांगितलं. 

"20 आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर खुलासा होईल. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसतोय, पण त्यानं पक्ष सोडला नाही. मी आणि माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबासोबत राहणार", असं संजय राऊत म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Lok Sabha Election 2024 : पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुन सुद्धा धक्कादायक निकालाची नोंद!
पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 'या' 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुनही सनसनाटी निकाल!
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Uddhav Thackeray:Devendra Fadnavis म्हणाले होते आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करतो,उद्धव ठाकरेंचा दावाAshok Chavan On PM Narendra Modi : नांदेडमधील पायाभूत सुविधांबद्दल मोदींना सांगितलं-अशोक चव्हाणLatur Hail Strom : लातूरमध्ये अवकाळी पावसाचा फटका, शेतीचं मोठं नुकसानABP Majha Headlines : 5 PM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
बजरंग सोनवणेंचं ठरलं! उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त सांगत घेतला मोठा निर्णय, मुंडे बहिण-भावावरही डागली तोफ
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ, त्यांना वेड लागलंय, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची जहरी टीका
Lok Sabha Election 2024 : पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुन सुद्धा धक्कादायक निकालाची नोंद!
पहिल्याच टप्प्यात कमी मतदान; 'या' 5 निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरुनही सनसनाटी निकाल!
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
अखेर संभाजीनगर शिवसेनेलाच; औरंगाबाद लोकसभेसाठी शिंदेंच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा
उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
उमेदवार पाडापाडीची ट्रीक, चौरंगी लढतीत डमी उमेदवारांची गर्दी, हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात
Mahua Moitra Video Fact Check : महुआ मोईत्रांनी उर्जेचा स्त्रोत सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
Fact Check : महुआ मोईत्रांनी एनर्जीचे रहस्य सेक्स खरंच म्हटलं होतं का? व्हायरल व्हिडिओतील सत्य समोर
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
पुण्यात शिक्षण, दुबई अन् लंडनमध्ये घर, अलिशान कार; 1400 कोटींची संपत्ती असलेल्या भाजपा उमेदवार
Raksha Khadse vs Rohini Khadse : 'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
'कोणी कोणत्या पक्षात जावं'वरून रावेरमध्ये राजकारण तापलं, नणंद-भावजयने एकमेकींना सुनावले खडेबोल!
Embed widget