एक्स्प्लोर

भाजपच्या ताब्यात शिवसेनेचे किती आमदार? संजय राऊतांचा आकड्याबाबत नवा दावा

Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crises : सोडून गेलेल्या काही आमदारांशी आमच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्यातील काहीजण अद्यापही आमच्या संपर्कात आहेत, असं राऊत म्हणाले.

Shivsena MP Sanjay Raut on Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस गडद होत चालला आहे. शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असून एकापाठोपाठ एक आमदार, खासदार, नगरसेवक शिंदे गटाकडे धाव घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सातत्यानं भाजपवर आगपाखड करत आहेत. हा सगळा भाजपचाच कट असल्याचा आरोप सातत्यानं संजय राऊतांकडून केला जात आहे. तसेच, आमदारांना डांबून ठेवण्यामागेही भाजपचाच हात असल्याचंही संजय राऊत वारंवार सांगत आहेत. आता राऊतांनी शिवसेनेचे 17 ते 18 आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा नवा दावा केला आहे. 

"सोडून गेलेल्या काही आमदारांशी आमच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्यातील काहीजण अद्यापही आमच्या संपर्कात आहेत. ते सांगतात, आम्हाला कसं जबरदस्तीनं नेलंय तिकडे. आज आमच्या दोन आमदारांची पत्रकार परिषद आहे. नितीन देशमुख आणि कैसाल पाटील तुम्हाला सगळी कथा सांगतील. अशाप्रकारे किमान 17 ते 18 आमदार हे भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहेत." असं संजय राऊत म्हणाले. मी भारतीय जनता पक्ष हाच शब्द वापरतोय. कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असा घणाघाती आरोपही संजय राऊतांनी भाजपवर केलाय. 

शिवसेना खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "ईडीच्या किंवा इतर काही अमिषांना बळी पडून जर आमदार काही पळाले असतील, विशेषतः ते स्वतःला बछडे आणि वाघ वैगरे म्हणून घ्यायचे, तर ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. हा पक्ष अद्याप मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली उभा आहे. 4 आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत. हे का गेलेत सोडून, याची कारण लवकरच समोर येतील." 

दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांची पत्रकार परिषद : संजय राऊत 

आज मुख्यमंत्री कोणतीही बैठक घेणार नसून वर्षावर काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी ते जाणार आहेत. त्यानंतर आमचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख पत्रकार परिषद घेतील. यावेळी पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित असतील. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना कोणतंही आवाहन केलेलं नाही. या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं एवढंच सांगायचं आहे.", अशी माहिती संजय राऊतांनी दिली. 

"20 आमदार आमच्या संपर्कात असून ते मुंबईत आल्यानंतर खुलासा होईल. माझ्या चेहऱ्यावर कोणतीही चिंता तुम्हाला दिसणार नाही. आम्हाला अशा परिस्थितीचा अनुभव आहे. आपण बाळासाहेबांचे भक्त आहोत इतकं म्हणणं पुरेसं नाही. दबावाला बळी पडून जर कोणी पक्ष सोडत असेल तर तो बाळासाहेबांचा भक्त असू शकत नाही. आमच्यावरही दबाव आहे. आमचा एक मंत्री चार दिवस ईडीच्या कार्यालयात जाऊन बसतोय, पण त्यानं पक्ष सोडला नाही. मी आणि माझ्या कुटुंबावरही ईडीचा दबाव आहे. पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरे कुटुंबासोबत राहणार", असं संजय राऊत म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
IPL 2024 Hardik Pandya Video: हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
Tutari Symbol: निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Shirsat :   महायुतीच्या मेळाव्यात बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरलीVinod Patil Exclusive : मी कुठलाही बालहट्ट करत नाहीये; ही निवडणूक विकासाठी लढवायची आहे - विनोद पाटीलChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 2 PM :  23 एप्रिल 2024 : ABP MajhaWashim Loksabha Election :वाशिमच्या जिल्हाधिकारी मतदार रॅलीत सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
मंत्रीपदाच्या कार्यकाळात वाढली एवढी संपत्ती; शिंदेंचे संदीपान भुमरे कोट्यवधींचे धनी
Raigad Lok Sabha : रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
रायगड लोकसभेत मतदारांना चकवा; तीन गीते, दोन तटकरे रिंगणात
IPL 2024 Hardik Pandya Video: हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
हार्दिक पांड्याकडून खराब क्षेत्ररक्षण, पदापर्ण करणारा गोलंदाज रागाने पाहतच राहिला, पाहा Video
Tutari Symbol: निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी, चिन्हाच्या चुकीच्या भाषांतरामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना टेन्शन!
Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'
हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळणार का? छगन भुजबळ हसत हसत म्हणतात, 'त्यांनी गोड बातमी द्यावी'
Salman Khan House Firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश
सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांना मिळाले मोठं यश
Nagpur News : मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
मोदीजी तुम्हाला सहा भाऊ, योगी आदित्यनाथांना सात भावंडं, मग फक्त मुस्लिमांवरच टीका का? काँग्रेस नेत्याचा बिनतोड सवाल
Solapur Lok Sabha: शरद पवारांचा जबरा डाव, भाजपमध्ये हयात घालवलेल्या फडणवीसांच्या मर्जीतील नेत्याला अलगद गळाला लावलं
शरद पवारांचा जबरा डाव, भाजपमध्ये हयात घालवलेल्या फडणवीसांच्या मर्जीतील नेत्याला अलगद गळाला लावलं
Embed widget