एक्स्प्लोर
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी थेट पोलिसाची कॉलर धरली!

औरंगाबाद: औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्याला दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचं समोर आलं आहे. आज दुपारी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होती. यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. परिसरात तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी जि.प.सदस्यांचं ओळखपत्र बघून त्यांना आत सोडण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेला उशीर होत असल्यामुळे चंद्रकांत खैरे संतप्त झाले आणि त्यांनी चक्क पोलिसाची कॉलर पकडून त्याला दमदाटी केली. हा सगळा प्रकार माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान, ‘भाजपनं पोलिसांच्या साथीनं आमच्या सदस्यांना वेळेत आत पोहोचू न देण्याचं षडयंत्र आखलं होतं. त्यामुळेच आपल्याला अनुचित कृती करावी लागली.’ असा दावा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























