शाहांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये : शिवसेना
'शिवसेना आणि अकाली दल हे भाजपचे सगळ्यात जुने मित्रपक्ष आहेत. पण दोस्त ही बेईमान हो गया तो करे क्या?' असा सवाल शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला.

काय म्हणाले होते अमित शाह?
आगामी निवडणुकीत भाजपसोबत न जाण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात अमित शाह यांनी भाजपची भूमिका मांडत एकप्रकारे शिवसेनेला इशारा दिला होता.
शिवसेनेसोबत युतीबाबतच्या कन्फ्युजनमधून (संभ्रम) कार्यकर्त्यांनी बाहेर पडावं. मित्रपक्ष सोबत आला तर त्यांना जिंकवू अन्यथा त्यांचाही पराभवाची धूळ चारु. त्यासाठी प्रत्येक बूथवर तयारी सुरु करा, विजय आपलाच होईल, अशा सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. स्वबळावर निवडणुका लढवून भाजप 48 पैकी किमान 40 जागा जिंकेल असा दावाही अमित शाहांनी केला होता.























