एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Exclusive: 2 वर्षात यशवंत जाधवांकडून मुंबईत 36 मालमत्ता खरेदी; चौकशीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती

Yashwant Jadhav Shivsena : यशवंत जाधव यांनी त्यांचे निकटवर्तीय अगरवाल यांच्या मदतीने कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचे तपास यंत्रणांना आढळून आले आहे.

Yashwant Jadhav Shivsena : मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात जाधव आणि अगरवाल यांनी मुंबईत 36 मालमत्ता खरेदी केली आहे. याचाच अर्थ  जाधव आणि अग्रवाल यांनी सरासरी वीस दिवसांत एक मालमत्ता खरेदी केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून ही माहिती समोर आलीय. यशवंत जाधव यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची यादी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा अहवाल 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.  दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर यशवंत जाधव आणि अगरवाल यांची प्रतिक्रिया प्रतिक्षेत आहे. 

यशवंत जाधव यांची 36 मालमत्तांची खरेदी?

केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केलेली आहे. गेल्या दोन वर्षांत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

कोणत्या वर्षात किती मालमत्ता खरेदी ?  
2020 - 07 
2021 - 24

कोणत्या महिन्यात किती मालमत्ता खरेदी ? 
मार्च 2020     - 1 
डिसेंबर 2020    - 2 
जानेवारी 2021 - 3  
फेब्रुवारी 2021 - 2 
मार्च 2021 - 5  
मे 2021 - 1 
जून 2021 - 2 
जुलै 2021 - 6 
ऑगस्ट 2021 - 2 
डिसेंबर 2021 - 3 

चार दिवस सुरू होती छापेमारी 

जवळपास चार दिवस आयकर विभागाने जाधव यांच्या घरी ठिय्या मांडला होता. यावेळी त्यांनी काही कागदपत्रेही ताब्यात घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉर्पोरेट अफेयर्सने यशवंत जाधव यांच्या 12 हून अधिक शेल कंपन्या उघडकीस आणल्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचेही चौकशीत समोर आले होते. त्याशिवाय कंपनी कायद्यानुसार या कंपन्यांमध्ये काही त्रुटीदेखील आढळून आल्या आहेत. त्यामुळे आता यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare meet Modi- Shah : शाहांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलीSanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Embed widget