एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Shivjayanti 2023: यंदाची शिवजयंती आग्रा किल्ल्यात साजरी होणार, पुरातत्व विभागाची अखेर परवानगी

आग्रा किल्ल्यात इतर सांस्कृतिक कार्यक्रमं साजरे करण्यासाठी परवानगी दिली जात, मग शिवजयंतीला परवानगी का नाकारली जातेय असा प्रश्न विचारत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. 

Shivjayanti 2023: आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास अखेर पुरातत्व खात्याने परवानगी दिली आहे. आग्रा किल्ल्यातील (Agra Fort) 'दिवाण-ए-आम'मध्ये शिवजयंती साजरी करायला पुरातत्व खात्याने (Archaeological Survey of India) परवानगी दिली आहे. या आधी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास नाकारण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाते मग शिवजयंतीबाबत भेदभाव का असा सवाल उपस्थित करत संतप्त शिवप्रेमींनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता पुरातत्व खात्याने ही परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

विनोद पाटील यांच्या अजिंक्य देवगिरी फौंडेशन आणि महाराष्ट्र सरकारकडून आग्रा किल्ला परिसरात यंदा शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानतर्फे 11 नोव्हेंबर 2022  पासून या परवानगीसाठी प्रयत्न केले जात होते. वेळोवेळी पाठपुरावा करुनही पुरातत्व खात्याकडून शिवजयंती साजरी करण्यास परवानगी नाकरण्यात येत होती. विशेष म्हणजे याच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये यापूर्वी आगाखान पुरस्कार कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती. एवढंच नाही तर अदनान सामीच्या कॉन्सर्टलाही परवानगी देण्यात आली होती. ज्यांचा ऐतिहासिक संबध त्या किल्ल्याशी नाही अशांना परवानगी दिली जाते. मग त्या किल्ल्याशी ऐतिहासिक संबध असलेल्या शिवाजी महाराजांच्या जयंतीलाच परवानगी का नाकारली जातेय असा सवाल अंजिक्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला होता. 

विनोद पाटील यांच्या प्रयत्नानंतर आता भारतीय पुरातत्व खात्याने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. 

सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी औरंगजेबानं छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजी यांना आग्रात नजरकैदेत ठेवलं होतं. या दोघांनाही त्या ठिकाणी मारण्याचा कट औरंगजेबानं आखला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मोठ्या शिताफीनं आग्य्रातून सुखरूप सुटका करुन घेतली. या घटनेला मराठ्यांच्या इतिहासात (Maratha History) अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या किल्ल्यामध्ये शिवजयंतीचा भव्य सोहळा साजरा व्हावा अशी अनेक शिवप्रेमींची इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :1 डिसेंबर 2024 :  ABP MajhaYugendra Pawar : माझ्यासह 11 उमेदवारांचे मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज - युगेंद्र पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले
Embed widget