एक्स्प्लोर
कोरोनापासून वाचण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे 'व्हायरस कवच'
कोरोना कधी नियंत्रणात येईल याबाबत कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही. अशावेळी फॅब्रिक स्प्रे आपलं सुरक्षा कवच म्हणून खूप उपयोगी पडणार आहे.कोरोनापासून बचावासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात महत्वाचं संशोधन करण्यात आलं आहे.
कोल्हापूर : कोरोनापासून बचावासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात महत्वाचं संशोधन करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या नॅनो स्कूल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागानं एक ‘फॅब्रिक स्प्रे’ची निर्मिती केली आहे. हा फॅब्रिक स्प्रे कपड्यांवर वापरायचा असून तो व्हायरस कवच म्हणून काम करतो. फॅब्रिक स्प्रेमुळे घातक विषाणूंपासून संरक्षण मिळतं, असा दावा या विभागाचे किरण कुमार शर्मा यांनी केलाय.
कसा आहे हा स्प्रे आणि काय उपयोग
फॅब्रिक स्प्रे हा वापरण्यास अत्यंत सुलभ आहे. आपण घरातून बाहेर जाताना कपड्यांवर स्प्रे करायचा आहे. ज्या पद्धतीनं आपण परफ्यूम वापरतो तसाच याचा वापर असणार आहे. हा स्प्रे कपड्यांवर मारला की एक प्रकारे जाळी तयार होते. त्यामुळं काय होतं तर कोरोनाचा विषाणू कपड्यांवर पडला तर तो केवळ 15 ते 20 मिनिटांत नष्ट होतो असं शर्मा यांनी सांगितलं. ज्या कपड्यांवर हा फॅब्रिक स्प्रे वापरला आहे ते कपडे धुवेपर्यंत आपल्याभोवती सुरक्षा कवच प्रमाणे हा स्प्रे काम करतो..
कोरोनाशी सामना करताना आपण अनेक सॅनिटायझर किंवा स्प्रे वापरत आहोत. पण ते आपल्या त्वचेवर वापर करतो. पण हा फॅब्रिक स्प्रे आपल्या शरीरावर नाही तर कपड्यांवर वापरायचा आहे. यामुळं समूह संसर्ग होण्याचा धोका कमी होणार आहे.
दिलासादायक... मुंबईत दोन आठवड्यात तर राज्यात 2 महिन्यात कोरोनावर नियंत्रण शक्य, IIT मुंबईचा अहवाल
फॅब्रिक स्प्रेच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी चाचण्या
या व्हायरस कवचच्या जगातील आघाडीच्या प्रयोगशाळेत चाचण्यात घेण्यात आल्या. यामध्ये विविध घातक विषाणूंना निष्क्रीय करण्याचा गुणधर्म असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अमेरिकेतील बीएसएल 4 या जगातील आघाडीच्या लॅबमधून निघालेले निष्कर्ष जगभर मान्य केले जातात. त्या लॅबमधून देखील या स्प्रेच्या गुणधर्मावर शिक्कामोर्तब झालं आहे.
लॅबमध्ये चाचणी घेताना या फॅब्रिक स्प्रेच्या संपर्कात एखादा विषाणू आल्यानंतर तो 15 मिनिटांत 99.99 टक्के निष्क्रिय झाल्याचं समोर आलं. सार्स-कोव्ह-2 हा कोविड-19 साथीला जबाबदार असलेला विषाणू सुद्धा या फॅब्रिक स्प्रेमुळं निष्क्रिय झाल्याचं चाचणीत समोर आलं.
या फॅब्रिक स्प्रेमध्ये पर्यावरणपुरक संयुगे असून त्याचा पर्य़ावरणाला कोणताही धोका नाही. त्यामुळं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापकांना संशोधन केलेल्या या फॅब्रिक स्प्रेमुळं कोरोनाचा संसर्ग रोखण्यात खूप मोठी मदत होणार आहे. कारण सध्या कोरोना कधी नियंत्रणात येईल याबाबत कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही. अशा वेळी हा फॅब्रिक स्प्रे आपलं सुरक्षा कवच म्हणून खूप उपयोगी पडणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement